02 March 2021

News Flash

IND vs BAN 3rd T20 : दीपक चहरची हॅटट्रिक; भारताचा बांगलादेशवर मालिका विजय

दीपक चहरचे ७ धावांत ६ बळी

बांगलादेश विरूद्धच्या तिसऱ्या आणि अंतिम टी २० सामन्यात दीपक चहरने घेतलेल्या हॅटट्रिकच्या बळावर भारताने सामना जिंकला. श्रेयस अय्यर आणि के एल राहुल यांच्या दमदार अर्धशतकामुळे भारताने बांगलादेशपुढे १७५ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना दीपक चहरने ७ धावा देऊन ६ बळी टिपले आणि भारताला मालिका २-१ अशी जिंकवून दिली.

भारताकडून कर्णधार रोहित शर्मा, शिखर धवन हे दोघे स्वस्तात परतल्यानंतर लोकेश राहुल आणि श्रेयस अय्यर यांनी डाव सावरला. राहुलने ७ चौकारांसह ३५ चेंडूत ५२ धावा केल्या. तर युवा श्रेयस अय्यरने ३३ चेंडूत ६२ धावा करत आपले पहिलेवहिले टी २० अर्धशतक झळकावले. मनीष पांडेनेही १३ चेंडूत २२ धावांची झंझावाती खेळी केली. त्यामुळे भारताने बांगलादेशपुढे १७५ धावांचे आव्हान ठेवले.

या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशने अत्यंत खराब खेळी केली. नईम आणि मिथून यांच्यात चांगली भागीदारी होत असताना मिथून २७ धावांवर बाद झाला. एकीकडे गडी बाद होत असताना धमाकेदार खेळी करणारा मोहम्मद नईमही मोक्याच्या वेळी ८१ धावांवर माघारी परतला. त्यामुळे बांगलादेशचा डाव १४४ धावांत आटोपला. दिपक चहरने एका हॅटट्रिक घेत ७ धावांत ६ बळी टिपले. त्याला सामनावीर घोषित करण्यात आले.

Live Blog

Highlights

 • 22:52 (IST)

  दीपक चहरची हॅटट्रिक; भारताचा बांगलादेशवर मालिका विजय

  बांगलादेश विरूद्धच्या तिसऱ्या आणि अंतिम टी २० सामन्यात दीपक चहरने घेतलेल्या हॅटट्रिकच्या बळावर भारताने सामना जिंकला. श्रेयस अय्यर आणि के एल राहुल यांच्या दमदार अर्धशतकामुळे भारताने बांगलादेशपुढे १७५ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना दीपक चहरने ७ धावा देऊन ६ बळी टिपले आणि भारताला मालिका २-१ अशी जिंकवून दिली.

 • 20:49 (IST)

  श्रेयस, राहुलची दमदार अर्धशतके; बांगलादेशपुढे १७५ धावांचे आव्हान

  श्रेयस अय्यर (६२) आणि के एल राहुल (५२) यांच्या दमदार अर्धशतकामुळे भारताने २० षटकात ५ बाद १७४ धावा केल्या आणि बांगलादेशपुढे १७५ धावांचे आव्हान ठेवले. मनीष पांडेनेही १३ चेंडूत २२ धावांची झंझावाती खेळी केली.

 • 18:57 (IST)

  बांगलादेशने नाणेफेक जिंकली; प्रथम गोलंदाजी

  भारत आणि बांगलादेश यांच्यातील तिसरा आणि अंतिम टी २० सामना आज नागपूरमध्ये खेळला जात आहे. या सामन्यात बांगलादेशचा कर्णधार मोहम्मदुल्लाह याने नाणेफेक प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

22:52 (IST)10 Nov 2019
दीपक चहरची हॅटट्रिक; भारताचा बांगलादेशवर मालिका विजय

बांगलादेश विरूद्धच्या तिसऱ्या आणि अंतिम टी २० सामन्यात दीपक चहरने घेतलेल्या हॅटट्रिकच्या बळावर भारताने सामना जिंकला. श्रेयस अय्यर आणि के एल राहुल यांच्या दमदार अर्धशतकामुळे भारताने बांगलादेशपुढे १७५ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना दीपक चहरने ७ धावा देऊन ६ बळी टिपले आणि भारताला मालिका २-१ अशी जिंकवून दिली.

22:40 (IST)10 Nov 2019
शफिउल इस्लाम बाद; दीपक चहरचा चौथा बळी

शफिउल इस्लाम हवेत फटका खेळताना बाद झाला आणि दीपक चहरला चौथा बळी मिळाला.

22:31 (IST)10 Nov 2019
कर्णधार महम्मदुल्लाह त्रिफळाचीत; बांगलादेश पराभवाच्या छायेत

कर्णधार महम्मदुल्लाह त्रिफळाचीत मोठा फटका खेळण्याच्या नादात त्रिफळाचीत झाला. त्याने १० चेंडूत ८ धावा केल्या. त्यामुळे आता बांगलादेश पराभवाच्या छायेत आहे.

22:26 (IST)10 Nov 2019
शिवम दुबेने गमावली हॅटट्रिकची संधी

नईम पाठोपाठ शिवम दुबेने अफिफ हुसेनला पहिल्याच चेंडूवर बाद केले. पण त्याच्या पुढच्या चेंडूवर त्याला बळी मिळवता आला नाही. त्यामुळे त्याने हॅटट्रिकची संधी गमावली. मात्र त्याने एकूण ४ षटकात ३ बळी टिपले.

22:20 (IST)10 Nov 2019
८१ धावा करणारा नईम माघारी; बांगलादेशला धक्का

एकीकडे गडी बाद होत असताना धमाकेदार खेळी करणारा मोहम्मद नईम ८१ धावा माघारी परतला. नईमला शिवम दुबेने त्रिफळाचीत केले. नईमने १० चौकार आणि २ षटकार खेचले.

22:06 (IST)10 Nov 2019
शिवम दुबेने घेतला पहिला आंतरराष्ट्रीय बळी

या मालिकेतून आंतरराष्ट्रीय टी २० क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या शिवम दुबेने तिसऱ्या सामन्यात  पहिला बळी टिपला. त्याने धोकादायक अनुभवी फलंदाज मुश्फिकूर रहीम याला पहिल्याच चेंडूवर त्रिफळाचीत केले. 

22:03 (IST)10 Nov 2019
मोहम्मद मिथून माघारी; बांगलादेशचे तिसरा धक्का

नईमच्या साथीने बांगलादेशचा डाव सावरणारा मोहम्मद मिथून २९ चेंडूत २७ धावा करून माघारी परतला. त्याने २ चौकार आणि १ षटकार खेचला.

21:51 (IST)10 Nov 2019
मोहम्मद नईमचे दमदार अर्धशतक

डावखुरा धडाकेबाज फलंदाज मोहम्मद नईम याने ३४ चेंडूत दमदार अर्धशतक ठोकलें. त्यासोबत त्याने मोहम्मद मिथूनच्या साथीने बांगलादेशचा डावही सावरला.

21:12 (IST)10 Nov 2019
दीपक चहरचे २ चेंडूत २ बळी

वेगवान गोलंदाज दीपक चहरने २ चेंडूत २ बळी टिपले. धोकादायक ठरू शकणारा सलामीवीर लिटन दास स्वस्तात बाद झाला. त्याने ९ धावा केल्या. तर त्याच्याच पुढच्या चेंडूवर सौम्या सरकार शून्यावर झेलबाद झाला.

20:49 (IST)10 Nov 2019
श्रेयस, राहुलची दमदार अर्धशतके; बांगलादेशपुढे १७५ धावांचे आव्हान

श्रेयस अय्यर (६२) आणि के एल राहुल (५२) यांच्या दमदार अर्धशतकामुळे भारताने २० षटकात ५ बाद १७४ धावा केल्या आणि बांगलादेशपुढे १७५ धावांचे आव्हान ठेवले. मनीष पांडेनेही १३ चेंडूत २२ धावांची झंझावाती खेळी केली.

20:27 (IST)10 Nov 2019
श्रेयस अय्यर झेलबाद; भारताला पाचवा धक्का

आपले पहिलेवहिले टी २० शतक झळकावणारा श्रेयस अय्यर ३३ चेंडूत ६२ धावा करून झेलबाद झाला. त्याने ३ चौकार आणि ५ षटकार लगावले.

20:14 (IST)10 Nov 2019
श्रेयस अय्यरचे धडाकेबाज अर्धशतक

युवा खेळाडू श्रेयस अय्यर याने धडाकेबाज खेळी करत २७ चेंडूत अर्धशतक झळकावले.

20:03 (IST)10 Nov 2019
दमदार अर्धशतकानंतर राहुल माघारी; भारताला धक्का

दमदार अर्धशतक ठोकल्यानंतर लोकेश राहुल लगेचच माघारी परतला. त्याने ७ चौकारांसह ३५ चेंडूत ५२ धावा केल्या.

19:57 (IST)10 Nov 2019
के एल राहुलचे दमदार अर्धशतक

बराच काळ फॉर्मशी झगडत असलेला लोकेश राहुल याला अखेर सूर गवसला. ३३ चेंडूत ७ चौकारांच्या मदतीने त्याने अर्धशतक झळकावले.

19:30 (IST)10 Nov 2019
धवन माघारी; भारताला दुसरा धक्का

रोहितनंतर शिखर धवनही लवकर माघारी परतला आणि भारताला दुसरा धक्का केला. त्याने ४ चौकारांसह १६ चेंडूत १९ धावा केल्या.

19:06 (IST)10 Nov 2019
कर्णधार रोहित त्रिफळाचीत; भारताला पहिला धक्का

कर्णधार रोहित शर्मा स्वस्तात त्रिफळाचीत झाला. त्यामुळे भारताला पहिला धक्का बसला. त्याने ६ चेंडूत २ धावा केल्या.

18:57 (IST)10 Nov 2019
बांगलादेशने नाणेफेक जिंकली; प्रथम गोलंदाजी

भारत आणि बांगलादेश यांच्यातील तिसरा आणि अंतिम टी २० सामना आज नागपूरमध्ये खेळला जात आहे. या सामन्यात बांगलादेशचा कर्णधार मोहम्मदुल्लाह याने नाणेफेक प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

Next Stories
1 इंग्लंड-न्यूझीलंडमध्ये पुन्हा झाली Super Over, ‘हा’ लागला निकाल
2 तेजस्विनीकडून ऑलिम्पिकचे स्थान पक्के!
3 मुश्ताक अली क्रिकेट स्पर्धा : ‘सूर्य’कुमार तळपला!
Just Now!
X