दीपक चहरने बांगलादेश विरूद्धच्या तिसऱ्या आणि अंतिम टी २० सामन्यात घेतलेल्या हॅटट्रिकच्या बळावर भारताने सामना जिंकला. भारताने बांगलादेशपुढे १७५ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना दीपक चहरने ७ धावा देऊन ६ बळी टिपले आणि भारताला मालिका २-१ अशी जिंकवून दिली. सामन्यात दीपक चहरने भेदक मारा केला. टी २० इतिहासातील सर्वोत्तम गोलंदाजीचा विश्वविक्रम त्याने आपल्या नावे केला.

IND vs BAN : दीपक चहर ठरला ‘असा’ विक्रम करणारा जगातील पहिला खेळाडू

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे सुपुत्र आणि BCCI चे नवनिर्वाचित सचिव जय शाह यांनी दीपक चहरची प्रशंसा केली. ‘दीपक चहरने धडाकेबाज गोलंदाजी केली. केवळ ७ धावा देत ६ गडी ही अप्रतिम कामगिरी होती. भारताकडून टी २० क्रिकेटमध्ये हॅटट्रिक घेणारा तो पहिला खेळाडू ठरला. दीपक चहर आणि सगळ्या खेळाडूंचे अभिनंदन!’ असे ट्विट जय शाह यांनी केले.

IND vs BAN : भारताला मिळाला नवा ‘हॅटट्रिकवीर’; केला बुमराहलाही न जमलेला विक्रम

हे वाचा – IND vs BAN : ‘क्रिकेटच्या देवा’ने उधळली दीपक चहरवर स्तुतिसुमने

दरम्यान, भारताकडून कर्णधार रोहित शर्मा, शिखर धवन हे दोघे स्वस्तात परतल्यानंतर लोकेश राहुल आणि श्रेयस अय्यर यांनी डाव सावरला. राहुलने ७ चौकारांसह ३५ चेंडूत ५२ धावा केल्या. तर युवा श्रेयस अय्यरने ३३ चेंडूत ६२ धावा करत आपले पहिलेवहिले टी २० अर्धशतक झळकावले. मनीष पांडेनेही १३ चेंडूत २२ धावांची झंझावाती खेळी केली. त्यामुळे भारताने बांगलादेशपुढे १७५ धावांचे आव्हान ठेवले.

Video : पहा दीपक चहरची धडाकेबाज हॅटट्रिक

या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशने अत्यंत खराब खेळी केली. नईम आणि मिथून यांच्यात चांगली भागीदारी होत असताना मिथून २७ धावांवर बाद झाला. एकीकडे गडी बाद होत असताना धमाकेदार खेळी करणारा मोहम्मद नईमही मोक्याच्या वेळी ८१ धावांवर माघारी परतला. त्यामुळे बांगलादेशचा डाव १४४ धावांत आटोपला. दिपक चहरने एका हॅटट्रिक घेत ७ धावांत ६ बळी टिपले. त्याला सामनावीर घोषित करण्यात आले.