News Flash

Video : अशी उडाली बांगलादेशच्या संघाची दाणादाण

दुसऱ्या डावात बांगलादेशच्या फलंदाजांचे लोटांगण

भारतीय संघाने कोलकात्याच्या इडन गार्डन्स मैदानावर झालेल्या पहिल्या दिवस-रात्र कसोटी सामन्यात बाजी मारली. टी २० मालिकेत २-१ असा विजय मिळवल्यानंतर कसोटी मालिकेतही भारताने २-० असे निर्विवाद वर्चस्व राखत ICC च्या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील आपले अव्वल स्थान कायम राखले. भारताने बांगलादेशवर १ डाव आणि ४६ धावांनी मात केली. पहिला डाव ३४७ धावांवर घोषित केल्यानंतर बांगलादेशचा दुसरा डाव भारताने १९५ धावांवर संपला.

दुसऱ्या डावातही भारतीय गोलंदाजांनी कमाल करून दाखवली. उमेश यादवने बांगलादेशचा निम्मा संघ गारद केला, तर त्याला इशांत शर्माने ४ बळी घेत चांगली साथ दिली. बांगलादेशचा एक फलंदाज जखमी झाल्यामुळे खेळू शकला नाही. अशा परिस्थितीत ९ गडी बाद करत भारताने ऐतिहासिक विजय साकारला.

अशी झाली बांगलादेशी वाघांची शिकार –

दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने बांगलादेशच्या सहा फलंदाजांना माघारी धाडलं होतं. सलामीवीर शदमन इस्लाम (०) आणि इमरूल कयास (५) दोघे स्वस्तात बाद झाले. कर्णधार मोमिनुल हक शून्यावर माघारी परतला. मोहम्मद मिथून देखील पाठोपाठ ६ धावांवर माघारी परतला. मोहम्मदुल्लाह रिटायर्ड हर्ट झाला. त्याने ७ चौकारांसह ३९ धावा केल्या होत्या. नंतर मेहिदी हसन मिराजदेखील (१५) बाद झाला. मुश्फिकूर रहीमने याने मात्र एक बाजू लावून धरली. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी खेळ सुरू झाल्यावर तैजूल इस्लाम आणि एबादत हुसेन हे दोघे झटपट बाद झाले आहेत. मुश्फिकूर रहीमने अर्धशतक ठोकले, पण तो ७४ धावांवर बाद झाला. मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात तो बाद झाला. त्याने १३ चौकार लगावले. अल-अमीन हुसेन याने ५ चौकार खेचत काही काळ मनोरंजन केले, पण अखेर तो झेलबाद झाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 24, 2019 3:04 pm

Web Title: ind vs ban india vs bangladesh first day night test fall of wickets bangladesh team second innings video vjb 91
Next Stories
1 टीम इंडियाची कसोटी क्रिकेटमध्ये ‘सत्ते पे सत्ता’
2 IND vs BAN : गुलाबी कसोटीत ‘विराट’सेनेची ऐतिहासिक कामगिरी
3 Video : बाबोsss ….. एकदम सिक्स कसा काय गेला?; ‘तो’ फटका पाहून कोहली अवाक
Just Now!
X