21 October 2020

News Flash

Video : रोहितचा ‘रूद्रावतार’! ३ चेंडूत लगावले ३ षटकार

बांगलादेशच्या मोसद्दक हुसेनला बसला दणका

भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसऱ्या टी २० सामन्यात भारताने ८ गडी राखून विजय मिळवला. दुसऱ्या टी २० सामन्यावर ‘महा’ वादळाचे सावट होते. मात्र त्या वादळाचा कोणताही अडथळा न येता सामना सुरळीत पार पडला. उलट पहिल्या सामन्यात विजय मिळवणाऱ्या बांगलादेशच्या संघाला या सामन्यात हिटमॅन वादळाचा तडाखा बसला. रोहितच्या ८५ धावांच्या खेळीच्या बळावर भारताने सामना जिंकला आणि मालिकेत १-१ अशी बरोबरी केली. १० नोव्हेंबरला तिसरा सामना होणार आहे.

Video : याला म्हणतात ‘बदला’… आधी संधी गमावली पण नंतर केला ‘हिसाब बराबर’

भारतीय कर्णधार रोहित शर्माने बांगलादेशच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. धडाकेबाज खेळी करणारा रोहित शर्मा ८५ धावांवर माघारी परतला. मोठा फटका खेळताना तो सीमारेषेवर बाद झाला. त्याने ६ चौकार आणि ६ षटकार लगावत केवळ ४३ चेंडूत ८५ धावा कुटल्या. रोहित शर्माने अर्धशतक साजरे केल्यावर आपला रुद्रावतार दाखवून दिला. त्याने मोसद्दक हुसेनच्या गोलंदाजीवर ३ चेंडूवर ३ षटकार खेचले.

दरम्यान, सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्मा याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. लिटन दास (२९), मोहम्मद नईम (३६), सौम्या सरकार (३०) आणि मोहम्मदुल्लाह (३०) यांच्या छोटेखानी खेळींच्या सांघिक कामगिरीच्या बळावर बांगलादेशने २० षटकात ६ बाद १५३ धावांपर्यंत मजल मारली आणि भारतापुढे १५४ धावांचे आव्हान ठेवले. भारताकडून चहलने सर्वाधिक २ बळी टिपले.

Video : पंतच्या अतिउत्साहाचा भारताला फटका; बांगलादेशला मिळाले जीवनदान

या आव्हानाचा पाठलाग करताना रोहित शर्मा आणि शिखर धवन या सलामी जोडीने शतकी भागीदारी केली. ११८ धावांच्या भागीदारीनंतर शिखर धवन पुढे येऊन मोठा फटका खेळण्याच्या नादात त्रिफळाचीत झाला. धवनने २७ चेंडूत ४ चौकार लगावत ३१ धावा केल्या. रोहितने मात्र फटकेबाजी सुरूच ठेवली. शतकाच्या नजीक पोहोचताना तो ८५ धावांवर माघारी परतला. त्याने ६ चौकार आणि ६ षटकार लगावत केवळ ४३ चेंडूत ८५ धावा कुटल्या. अखेर श्रेयस अय्यरने धडाकेबाज खेळी करत १३ चेंडूत नाबाद २४ धावा केल्या आणि भारताला विजय मिळवून दिला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 7, 2019 11:06 pm

Web Title: ind vs ban india vs bangladesh rohit sharma hits 3 balls 3 sixes super power hitting hitman video vjb 91
Next Stories
1 Video : याला म्हणतात ‘बदला’… आधी संधी गमावली पण नंतर केला ‘हिसाब बराबर’
2 Video : पंतच्या अतिउत्साहाचा भारताला फटका; बांगलादेशला मिळाले जीवनदान
3 शतकी टी-२० सामना खेळणारा रोहित पहिला भारतीय, जाणून घ्या पहिल्यांदा शंभरावी कसोटी आणि वन-डे खेळणारे भारतीय
Just Now!
X