भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसऱ्या टी २० सामन्यात भारताने ८ गडी राखून विजय मिळवला. दुसऱ्या टी २० सामन्यावर ‘महा’ वादळाचे सावट होते. मात्र त्या वादळाचा कोणताही अडथळा न येता सामना सुरळीत पार पडला. उलट पहिल्या सामन्यात विजय मिळवणाऱ्या बांगलादेशच्या संघाला या सामन्यात हिटमॅन वादळाचा तडाखा बसला. रोहितच्या ८५ धावांच्या खेळीच्या बळावर भारताने सामना जिंकला आणि मालिकेत १-१ अशी बरोबरी केली.

IND vs BAN : सामना जिंकला, सामनावीर ठरला… तरीही रोहितला ‘या’ गोष्टीची खंत

राजकोटच्या खेळपट्टीचा मला अंदाज होता. ती खेळपट्टी फलंदाजीला पोषक आहे याची मला कल्पना होती. त्यामुळे गोलंदाजांना त्या खेळपट्टीवर गोलंदाजी करणे जड जाईल असेही मला वाटले. माझा तो अंदाज खरा ठरला. दुसऱ्या डावात गोलंदाजांना खेळपट्टीकडून अजिबात मदत मिळाली नाही. त्याचा फायदा घेत आम्ही पॉवर-प्लेमध्ये तुफान फटकेबाजी केली. त्यानंतर मात्र ती लय कायम राखणे हे एकच आव्हान होते. सामन्याची स्थिती पूर्णपणे माहिती असल्याने गोलंदाज कोणाही असो, चेंडू सीमापार पोहोचवणे हेच ध्येय अशा पद्धतीने मी खेळलो. २०१९ हे माझ्यासाठी चांगले वर्ष ठरले आहे. वर्षाचा शेवटही मला गोड करायचा आहे”, असे रोहितने सांगितले.

हे वाचा – IND vs BAN : एकच वादा रोहितदादा.. लगावला विक्रमांचा चौकार

भारतीय कर्णधार रोहित शर्माने बांगलादेशच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. धडाकेबाज खेळी करणारा रोहित शर्मा ८५ धावांवर माघारी परतला. मोठा फटका खेळताना तो सीमारेषेवर बाद झाला. त्याने ६ चौकार आणि ६ षटकार लगावत केवळ ४३ चेंडूत ८५ धावा कुटल्या. त्याचसोबत त्याने विक्रमांचा चौकार लगावला.

पहा Video – डोकेदुखी ठरलेला मुश्फिकूर सापळ्यात अडकला…

दरम्यान, सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्मा याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. लिटन दास (२९), मोहम्मद नईम (३६), सौम्या सरकार (३०) आणि मोहम्मदुल्लाह (३०) यांच्या छोटेखानी खेळींच्या सांघिक कामगिरीच्या बळावर बांगलादेशने २० षटकात ६ बाद १५३ धावांपर्यंत मजल मारली आणि भारतापुढे १५४ धावांचे आव्हान ठेवले. भारताकडून चहलने सर्वाधिक २ बळी टिपले.

या आव्हानाचा पाठलाग करताना रोहित शर्मा आणि शिखर धवन या सलामी जोडीने शतकी भागीदारी केली. ११८ धावांच्या भागीदारीनंतर शिखर धवन पुढे येऊन मोठा फटका खेळण्याच्या नादात त्रिफळाचीत झाला. धवनने २७ चेंडूत ४ चौकार लगावत ३१ धावा केल्या. रोहितने मात्र फटकेबाजी सुरूच ठेवली. शतकाच्या नजीक पोहोचताना तो ८५ धावांवर माघारी परतला. त्याने ६ चौकार आणि ६ षटकार लगावत केवळ ४३ चेंडूत ८५ धावा कुटल्या. अखेर श्रेयस अय्यरने धडाकेबाज खेळी करत १३ चेंडूत नाबाद २४ धावा केल्या आणि भारताला विजय मिळवून दिला.