कोलकात्याच्या इडन गार्डन्स मैदानावर झालेल्या पहिल्या दिवस-रात्र कसोटी सामन्यात भारतीय संघाने बाजी मारली. टी २० मालिकेत २-१ असा विजय मिळवल्यानंतर कसोटी मालिकेतही भारताने २-० असे निर्विवाद वर्चस्व राखत ICC च्या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील आपले अव्वल स्थान कायम राखले. भारताने बांगलादेशवर १ डाव आणि ४६ धावांनी मात केली. पहिला डाव ३४७ धावांवर घोषित केल्यानंतर बांगलादेशचा दुसरा डाव भारताने १९५ धावांवर संपला.

IND vs BAN : “आम्ही पुरेसं क्रिकेट खेळलोय…”; कॉमेंट्री बॉक्समध्ये हर्षा भोगलेचा अपमान

विराटच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने दमदार कामगिरी केली. त्यामुळे भारताच्या संघाचे सर्वत्र कौतुक होत आहे. पण माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी मात्र विराटचा खरपूस समाचार घेतला आहे. “सामन्याच्या नंतर भारताचा कर्णधार विराट कोहली याने जे विधान केले त्या विधानावर मला बोलायचे आहे. भारताचा बांगलादेशविरूद्धचा विजय हा नक्कीच उत्तम आहे. पण विराट म्हणाला की २००० सालापासून पुढे म्हणजेच गांगुलीकडे कर्णधारपदाची धुरा सोपवल्यानंतर भारतीय संघ जिंकू लागला. हे त्याचे विधान त्याने कदाचित सध्याचे BCCI अध्यक्ष सौरव गांगुली याला खुश करण्यासाठी केले असेल, पण भारत १९७० आणि १९८० च्या दशकातही क्रिकेट सामने जिंकत होता. त्यावेळी विराट जन्मलादेखील नव्हता”, अशा शब्दात सुनील गावसकर यांनी विराटवर टीका केली.

अनेकांना असं वाटतं की क्रिकेट २००० साली सुरू झाले. पण त्यांना मला सांगावंसं वाटतं की १९७० मध्ये भारतीय संघ परदेशात जिंकला आहे. १९८६ साली भारताने इतर खंडात सामने जिंकले. इतकेच नव्हे तर भारताने परदेशात कसोटी मालिकाही अनिर्णित ठेवली आहे आणि इतर संघांप्रमाणे ते भारत पराभूतदेखील झाला आहे, असेही गावसकर यांनी नमूद केले.