News Flash

IND vs BAN : विराटकडे ‘सुवर्णसंधी’; ‘हा’ पराक्रम करणारा ठरणार पहिला कर्णधार

१४ नोव्हेंबरपासून इंदूरमध्ये पहिला कसोटी सामना

भारतीय संघाने नुकतीच बांगलादेश विरूद्ध टी २० मालिका जिंकली. पहिला सामना भारताने गमावला होता. पण त्यानंतर पुढील दोनही सामने भारताने दमदार खेळ करून जिंकले. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने मालिका २-१ असा जिंकला. या सामन्यात भारताचा नियमित कर्णधार विराट शर्मा याला विश्रांती देण्यात आली होती. पण उद्यापासून सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी मात्र तो भारतीय संघात पुनरागमन करणार आहे. यासोबतच त्याला एक मोठा विक्रम करण्याची संधी आहे.

धक्कादायक! …त्यावेळी वाटलं की सगळं संपलं – विराट

इंदूर कसोटीच्या पहिल्या डावात ३२ धावा केल्यास विराट कोहली कसोटी क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून ५ हजार धावांचा टप्पा पूर्ण करेल. असा पराक्रम करणारा विराट कोहली भारताचा पहिला कर्णधार ठरू शकेल. तसेच वेगवान ५ हजार कसोटी धावा करणारा देखील तो जगातील पहिला कर्णधारही ठरू शकेल. याशिवाय कोहलीने १४७ धावा केल्यास तो कसोटी कारकिर्दीतील धावांच्या बाबतीत गांगुलीला पिछाडीवर टाकेल. विराटच्या सध्या ७ हजार ०६६ कसोटी धावा आहेत. तर गांगुलीच्या कसोटीत ७ हजार २१२ धावा आहेत.

Video : पंचांनी दिला ‘नो-बॉल’; पोलार्डने बदलायला लावला निर्णय

दरम्यान, नुकतेच विराटने शारीरिक ताण आणि समस्या यांवरही भाष्य केले आहे. मानसिक आणि शारीरिक ताण येऊ नये म्हणून BCCI ने विराटला विश्रांती दिली होती. पण काही वर्षांपूर्वी मात्र विराटला मानसिक तक्रारींना सामोरे जावे लागले होते. याबाबत विराटने गुपित उघड केले. २०१४ मध्ये भारताचा संघ इंग्लंड दौऱ्यावर होता. त्यावेळी विराटला एकही अर्धशतक झळकावता आलेले नव्हते. त्या वेळेबाबत विराटने मन मोकळे केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 13, 2019 5:41 pm

Web Title: ind vs ban india vs bangladesh virat kohli chance to break record first indian to score 5000 run mark in test cricket vjb 91
Next Stories
1 मुंबई इंडियन्सच्या खेळाडूला ‘बॉल-टॅम्परिंग’ प्रकरणी ICC चा दणका
2 …त्यावेळी वाटलं की सगळं संपलं – विराट
3 दिवस-रात्र कसोटी सामन्यासाठी भारत तयार – कर्णधार विराट कोहली
Just Now!
X