News Flash

IND vs BAN : विराटवर इंग्लंडचा माजी कर्णधार खुश, उधळली स्तुतिसुमने

विराटच्या नेतृत्वाखाली भारताने जिंकली सलग सहावी कसोटी

पहिल्या कसोटी सामन्यात भारताने बांगलादेश विरूद्ध एक डाव आणि १३० धावांनी विजय मिळवला. दुसऱ्या डावात मोहम्मद शमीने घेतलेले चार बळी आणि त्याला इतर गोलंदाजांची मिळालेली साथ याच्या बळावर भारताने दणदणीत विजय मिळवला. मयांक अग्रवालने केलेल्या द्विशतकामुळे भारताला पहिल्या डावात मोठी आघाडी घेता आली होती. त्यानंतर डोंगराएवढ्या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशचा दुसरा डाव मात्र अवघ्या २१३ धावांवर आटोपला. या विजयासह भारताने कसोटी मालिकेत १-० ने आघाडी घेतली.

‘Practice makes ‘Hitman’ perfect!’, हा व्हिडीओ एकदा पहाच

बांगलादेशवर डावाने मिळवलेल्या विजयासोबतच कर्णधार विराट कोहलीने महेंद्रसिंह धोनीचा विक्रम मोडला. कसोटी क्रिकेटमध्ये कर्णधार या नात्याने विराटचा हा १० वा डावाने विजय ठरला. धोनीने कर्णधार म्हणून ९ कसोटी सामन्यांमध्ये भारताला डावाने विजय मिळवून दिला होता. तर मोहम्मद अझरूद्दीनने ८ वेळा हा पराक्रम केला होता. त्यानंतर इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन यांने विराटचे तोंडभरून कौतुक केले आहे. “टीम इंडियाचे विविध कर्णधार झाले. त्यातील अनेक कर्णधार यशस्वी ठरले. पण विराट हा भारताचा सर्वात जलद गतीने यशस्वी ठरलेला कर्णधार आहे”, असे वॉनने ट्विट केले.

दरम्यान, सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करत असताना बांगलादेशचा संघ केवळ १५० धावांवर गारद झाला. यानंतर मयांक अग्रवालचं द्विशतक आणि त्याला इतर फलंदाजांनी दिलेली साथ या जोरावर भारताने पहिल्या डावात मोठी आघाडी घेतली. भारताने आपला पहिला डाव ४९३ धावांवर घोषित केला.

Video : असे बाद झाले बांगलादेशचे १० गडी

प्रत्युत्तरादाखल बांगलादेशची दुसऱ्या डावातही खराब सुरुवात झाली. मोहम्मद शमी, रविचंद्रन आश्विन, उमेश यादव आणि इशांत शर्मा यांनी टिच्चून मारा करत बांगलादेशची झुंज मोडून काढली. दुसऱ्या डावात बांगलादेशकडून मुश्फिकुर रहिमने ६४ धावांची खेळी केली, मात्र त्याची झुंज अपयशीच ठरली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 17, 2019 12:14 pm

Web Title: ind vs ban india vs bangladesh virat kohli win michael vaughan praise vjb 91
Next Stories
1 Video : इशांतनं विचारला असा प्रश्न की शमी मैदानातच हसतच बसला…
2 IND vs BAN : विराटच्या ड्रेसिंग रूममधील ‘त्या’ इशाऱ्यावर मयांक म्हणतो…
3 पुढे धोका आहे..
Just Now!
X