News Flash

Video : दिवस-रात्र कसोटी सामन्यासाठी भारत सज्ज, इडन गार्डन्स गुलाबी रंगात सजलं

शुक्रवारपासून सामन्याला सुरुवात

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ आपल्या पहिल्या दिवस-रात्र कसोटी सामन्यासाठी सज्ज झाला आहे. २२ नोव्हेंबरला कोलकात्याच्या इडन गार्डन्स मैदानात हा सामना रंगणार आहे. दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारत सध्या १-० ने आघाडीवर आहे. भारतीय संघासाठी महत्वाच्या ठरणाऱ्या या सामन्यासाठी कोलकाता शहर सज्ज झालेलं आहे. इडन गार्डन्स परिसर आणि शहरातील महत्वाच्या वास्तूंना य़ा निमीत्ताने खास गुलाबी रंगात सजवण्यात आलेलं आहे.

भारतीय संघ पहिल्यांदाच गुलाबी चेंडूवर सामना खेळणार असल्यामुळे, खेळाडू कसून तयारी करत आहेत. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीनेही या सामन्यासाठी विशेष पुढाकार घेतला होता. याआधी दिवस-रात्र कसोटी सामना खेळण्यास बीसीसीआयचा विरोध होता, मात्र गांगुलीच्या पुढाकारामुळे बीसीसीआयने आपल्या भूमिकेत बदल केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 20, 2019 6:15 pm

Web Title: ind vs ban kolkata is ready for team india first pink ball test watch video here psd 91
टॅग : Eden Gardens,Ind Vs Ban
Next Stories
1 सोशल मीडियावर कोहलीने घातलं चाहत्यांना कोडं, तुम्हाला उत्तर माहिती आहे का?
2 दिवस-रात्र कसोटीत ‘यांचा’ बोलबाला; पहा भन्नाट आकडेवारी
3 IPL 2020 : युवराजसाठी मोठा संघ सरसावला, आगामी लिलावात बोली लावण्याचे संकेत
Just Now!
X