पहिल्या कसोटी सामन्यात भारताने बांगलादेशला एक डाव आणि १३० धावांनी पराभूत केले. दुसऱ्या डावात मोहम्मद शमीने घेतलेले चार बळी आणि त्याला इतर गोलंदाजांची मिळालेली साथ याच्या बळावर भारताने दणदणीत विजय मिळवला. मयांक अग्रवालने केलेल्या द्विशतकामुळे भारताला पहिल्या डावात मोठी आघाडी घेता आली होती. त्यानंतर डोंगराएवढ्या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशचा दुसरा डाव मात्र अवघ्या २१३ धावांवर आटोपला. भारताने सामन्यात विजय मिळवत २ सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडी घेतली आणि कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत त्रिशतकी मजल मारली.

IND vs BAN : दिवस-रात्र कसोटीआधी रहाणेला पडलं ‘हे’ स्वप्न

भारतीय संघ शुक्रवारपासून (२२ नोव्हें) पहिला दिवस-रात्र कसोटी सामना खेळणार आहे. हे सामने गुलाबी चेंडूने खेळावे लागतात. त्यामुळे एकीकडे भारतीय संघ आता गुलाबी चेंडूने सराव करत आहे, तर दुसरीकडे बांगलादेशचे गोलंदाज गुलाबी चेंडू पाण्यात बुडवून ओल्या चेंडूने दिवस-रात्र कसोटीसाठी सराव करत आहेत. “आमचे गोलंदाज चेंडू पाण्यात बुडवून गोलंदाजीचा सराव करत आहेत. काही दिवसात वेगवान गोलंदाजदेखील चेंडू थोडासा ओला करून सराव करतील. येत्या काही दिवसांत दिवस-रात्र कसोटीला लागणारी तयारी पूर्ण केली जाईल. चेंडू ओला असताना तो नेहमीपेक्षा वेगवान होईल. ओला चेंडू खेळपट्टीवर स्कीड होईल. ओल्या चेंडूने फिरकीपटूंच्या गोलंदाजीलाही धार येईल. तसंच चेंडूला फिरत आणि उसळीही मिळू शकेल”, बांगलादेशचा फिरकीपटू मेहिदी हसन मिराज याने सांगितले.

“मी गुलाबी चेंडूवर फलंदाजी केली आहे. त्या चेंडूला चांगला स्विंग मिळतो आणि चेंडूला चांगलाच वेग असतो. बॅटला लागूनही तो चेंडू खूप वेगाने जातो. त्यामुळे त्या चेंडूवर कट शॉटपण खेळता येतो. गुलाबी चेंडू खेळण्यासाठी आम्ही अजून तरी नवीन आहोत. गुलाबी चेंडूने आम्ही फारसे क्रिकेट खेळलेलो नाही. पण आम्ही शक्य तितका सराव करत आहोत. गुलाबी चेंडूने खेळताना सुरूवातीला आम्हाला थोडासा त्रास होईल, पण लवकरात लवकर त्या चेंडूवर खेळणं आत्मसात करणं हेच आमचं ध्येय आहे”, असा विश्वासही त्याने व्यक्त केला.

रवी शास्त्री महाकालेश्वर मंदिरात; दिवस-रात्र सामन्याआधी केली पूजा

दरम्यान, सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करत असताना बांगलादेशचा संघ केवळ १५० धावांवर गारद झाला. यानंतर मयांक अग्रवालचं द्विशतक आणि त्याला इतर फलंदाजांनी दिलेली साथ या जोरावर भारताने पहिल्या डावात मोठी आघाडी घेतली. भारताने आपला पहिला डाव ४९३ धावांवर घोषित केला. प्रत्युत्तरादाखल बांगलादेशची दुसऱ्या डावातही खराब सुरुवात झाली. मोहम्मद शमी, रविचंद्रन आश्विन, उमेश यादव आणि इशांत शर्मा यांनी टिच्चून मारा करत बांगलादेशची झुंज मोडून काढली. दुसऱ्या डावात बांगलादेशकडून मुश्फिकुर रहिमने ६४ धावांची खेळी केली, मात्र त्याची झुंज अपयशीच ठरली.