27 February 2021

News Flash

IND vs ENG: इंग्लंडच्या फिरकीपटूंची कमाल तरीही भारताकडे ३५१ धावांची आघाडी

रोहित, पुजारा, पंत, रहाणे स्वस्तात माघारी

इंग्लंडविरूद्धच्या दुसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी भारताचे भरवशाचे फलंदाज पहिल्या सत्रात झटपट बाद झाले. रविचंद्रन अश्विनने ज्या फिरकीच्या जोरावर दुसऱ्या दिवशी इंग्लंडला उद्ध्वस्त केलं, त्याच फिरकीने तिसऱ्या दिवशी भारतीय फलंदाजांना हादरवून सोडलं. चांगल्या लयीत असलेला चेतेश्वर पुजारा (८) कमनशिबी ठरला आणि धावबाद झाला. पण त्यानंतर रोहित शर्मा (२६), अजिंक्य रहाणे (१०), ऋषभ पंत (८) आणि अक्षर पटेल (७) यांची इंग्लंडच्या फिरकीपटूंचेनी शिकार केली. कर्णधार विराट कोहली (३५*) आणि रविचंद्रन अश्विन (३०*) यांनी सत्र संपेपर्यंत खेळपट्टीवर तग धरला आणि भारताला ६ बाद १४९ धावांपर्यंत मजल मारून दिली.

Ind vs Eng Video: रोहित – पंत यांच्यात मैदानावर राडा? पाहा नक्की काय झालं…

Ind vs Eng Video: कमनशिबी पुजारा! ‘अशा’ विचित्र पद्धतीने झाला बाद

दुसऱ्या दिवशी अश्विनच्या फिरकीपुढे इंग्लंडच्या फलंदाजांनी लोटांगण घातलं. सलामीवीर बर्न्स (०), सिबली (१६), लॉरेन्स (९), कर्णधार रूट (६), मोईन अली(६), ओली स्टोन (१), जॅक लीच (५) आणि स्टुअर्ट ब्रॉड (०) सारे स्वस्तात माघारी परतले. बेन स्टोक्स (१८) आणि ओली पोप (२२) यांनी थोड्या धावा केल्या, तर नवोदित बेन फोक्सने नाबाद ४२ धावांची झुंजार खेळी केली. त्यामुळे इंग्लंडला १३४ धावांपर्यंत मजल मारता आली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 15, 2021 11:42 am

Web Title: ind vs eng 2nd test day 3 live updates england spinners jack leech moeen ali spins web around indian batsmen fightback from virat kohli ashwin vjb 91
Next Stories
1 चेन्नईच्या खेळपट्टीवरून शेन वॉर्न-मायकल वॉनमध्ये ‘ट्विटरवॉर’
2 Ind vs Eng Video: रोहित – पंत यांच्यात मैदानावर राडा? पाहा नक्की काय झालं…
3 टी-२० मध्ये पाकिस्तानच्या विजयाचं ‘शतक’, असा पराक्रम करणारा पहिलाच संघ
Just Now!
X