News Flash

अश्विनचा इंग्लंडला दमदार ‘पंच’; दुसऱ्या दिवसअखेर भारत १ बाद ५४

भारतीय संघ भक्कम स्थितीत

इंग्लंडविरूद्धच्या दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवसअखेर भारताने दुसऱ्या डावात एका गड्याच्या मोबदल्यात ५४ धावा केल्या. पहिल्या डावात भारताने ३२९ धावा केल्यानंतर इंग्लंडचा डाव अवघ्या १३४ धावांमध्ये आटोपला. रविचंद्रन अश्विनने पाच बळी घेत पहिल्या डावाअखेर भारताला १९५ धावांची भक्कम आघाडी मिळवून दिली. त्यानंतर दुसऱ्या डावात भारताचा सलामीवीर शुबमन गिल (१४) लवकर बाद झाला. पण रोहित शर्मा (२५*) आणि चेतेश्वर पुजारा (७*) या दोघांनी दिवसाचा खेळ संपेपर्यंत फलंदाजी केली आणि भारताला २४९ धावांची आघाडी मिळवून दिली.

Video: हवेत झेप घेत अजिंक्यने घेतलेला भन्नाट झेल पाहिलात का?

भारताने दिलेल्या ३३० धावांच्या आव्हानाला प्रत्युत्तर देताना भारतीय फिरकीपटूंपुढे इंग्लंडच्या फलंदाजांची दाणादाण उडाली. सलामीवीर रॉरी बर्न्स शून्यावर बाद झाला. पाठोपाठ डॉम सिबली (१६) आणि डॅन लॉरेन्स (९) दोघांना अश्विनने बाद केले. आपली पहिली कसोटी खेळणाऱ्या अक्षर पटेलने तुफान फॉर्मात असलेल्या कर्णधार जो रूटला (६) स्वस्तात माघारी धाडले. बेन स्टोक्स (१८) आणि ओली पोप (२२) यांनी थोड्या धावा केल्या, पण त्यांनादेखील फार काळ खेळपट्टी सांभाळता आली नाही. मोईन अली(६), ओली स्टोन (१), जॅक लीच (५) आणि स्टुअर्ट ब्रॉड (०) हेदेखील स्वस्तात बाद झाले. नवोदित बेन फोक्सने नाबाद ४२ धावांची झुंजार खेळी केली. त्यामुळे इंग्लंडला १३४ धावांपर्यंत मजल मारता आली. अश्विनने ५, अक्षर पटेल आणि इशांत शर्माने २-२ तर मोहम्मद सिराजने १ बळी घेतला.

रोहितच्या तुफानी फलंदाजीचे इंग्लंडच्या माजी कर्णधाराकडून कौतुक, म्हणाला…

दरम्यान, त्याआधी भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. शुबमन गिल (०), चेतेश्वर पुजारा (२१), विराट कोहली (०) हे तिघे स्वस्तात बाद झाले. रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे यांनी १६२ धावांची भागीदारी केली. रोहित दीडशतक (१६१) ठोकून तर अजिंक्य अर्धशतक (६७) झळकावून माघारी परतला. त्यानंतर ऋषभ पंतच्या नाबाद अर्धशतकी (५८) खेळीव्यतिरिक्त इतर फलंदाजांनी निराशा केली. पंतच्या फटकेबाजीच्या बळावर भारताने ३२९ धावांपर्यंत मजल मारली. मोईन अलीने ४, ओली स्टोनने ३, जॅक लीचने २ तर कर्णधार रूटने १ बळी घेतला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 14, 2021 4:55 pm

Web Title: ind vs eng 2nd test live updates r ashwin five wickets rohit sharma big hitting batting virat kohli whistle podu rishabh pant marvel catch vjb 91
Next Stories
1 IND vs ENG: मॅच सुरू असताना मोदींनी आकाशातून टिपला मैदानाचा फोटो; म्हणाले…
2 What a catch : पंतने घेतलेले दोन्ही झेल पाहून तूम्हीही व्हाल हैराण
3 IND vs ENG: अनुभवी अश्विनच्या फिरकीपुढे इंग्लंडचे लोटांगण
Just Now!
X