22 January 2021

News Flash

रवी शास्त्रीचींच यो-यो टेस्ट करा; ट्विटरवर नेटकऱ्यांकडून खिल्ली

रवी शास्त्रींचा फोटो बीसीसीआयने ट्विट केला आहे.

भारतीय संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यावर पहिला कसोटी सामना भारताने गमावला आहे. तर दुसरा सामना आजपासून लॉर्ड्स मैदानावर सुरु होणार आहे. टी-२० मालिकेत विजयी झाल्यानंतर एकदिवसीय मालिकेमध्ये भारताचा पराभव झाला. यानंतर सध्या पाच सामन्यांची मालिका सुरु आहे.

पहिल्या सामन्यात कर्णधार विराट कोहली वगळता कोणत्याही फलंदाजाला चमकदार कामगिरी करता आली नाही. या सामन्याच्या पहिल्या डावात विराटने १४९ धावा आणि दुसऱ्या डावात ५१ धावा केल्या होत्या. विराटला दुसऱ्या फलंदाजांनी साथ न दिल्यामुळे भारताचा ३१ धावांनी पराभव झाला. या पराभवानंतर भारताच्या फलंदाजीवर अत्यंत टीका झाली. याबरोबरच भारताचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यावर खजी अंशी टीका करण्यात आली. पण याशिवाय, एका फोटोमुळे शास्त्रीबुवा सोशल मीडियावर ट्रोल होत आहेत.

रवी शास्त्रीचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये रवी शास्त्री यांचे पोट दिसत आहे. त्यामुळे त्यांना ट्रोल करण्यात येत असून रवी शास्त्री यांचीच आता ‘यो-यो’ चाचणी करा, त्यांना या चाचणीत पास होणे गरजेचे आहे, डायटिंग करणं गरजेचे आहे, मनापासून क्रिकेटचा चाहता आणि पोट पाहून फ़ुटबाँलचे चाहते.. यासारख्या मजेशीर कमेंट यूजरनी ट्विटरवर केल्या आहेत.

दुसऱ्या सामन्याआधी लॉर्ड्सच्या खेळपट्टीची पाहणी करताना रवी शास्त्रींचा फोटो बीसीसीआयने ट्विट केला होता. या फोटोवरूनच रवी शास्त्री यांच्यावर कमेंट करण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 9, 2018 6:51 pm

Web Title: ind vs eng 2nd test lords india main coach ravi shastri trolled on twitter
Next Stories
1 विराट सर्वोत्तम कसोटीपटू – स्टीव्ह वॉ
2 मोहम्मद युसूफ म्हणतो ‘पाकिस्तान २०१९ क्रिकेट विश्वचषक जिंकेल’; नेटकऱ्यांनी केले ट्रोल
3 England vs India 2nd Test : लॉर्ड्सवर विराटसेना जिंकणारच? हे आहे कारण…
Just Now!
X