News Flash

जो रुटचा द्वशतकी दणका; इंग्लंडचा ५७८ धावांचा डोंगर

बुमराह-अश्विनचे प्रत्येकी ३-३ बळी

कर्णधार जो रुटच्या द्विशतकाला बेन स्टोक आणि सिब्ली यांच्या अर्धशतकाची मिळालेल्या साथीमुळे इंग्लंडनं चेन्नई येथील पिहिल्या कसोटी सामन्यात ५७८ धावांचा डोंगर उभा केला आहे. कर्णधार जो रुट यानं संयमी फलंदाजी करत २१८ धावांची खेळी करत इंग्लंडला मोठी धावसंख्या उभारण्यात मोलाची भूमिका साधली. इंग्लंड संघानं पहिल्या डावात १९० षटकांत ५७८ धावांचा डोंगर उभा केला. रुटशिवाय बेन स्टोक्स (८२) आणि सिब्ली (८७) यांनी अर्धशतकी खेळी केली. भारताकडून जसप्रीत बुमराह आणि आर. अश्विन यांनी प्रत्येकी ३-३ बळी घेतले. तर इशांत शर्मा आणि शाबाज नदीम यांना प्रत्येकी २-२ बळी मिळाले.

चेन्नई कसोटीच्या तिसऱ्या दिवशी इंग्लंडनं ८ बाद ५५५ धावांवरुन खेळण्यास सुरुवात केली. तिसऱ्या दिवशी इंग्लंड संघानं २३ धावांची भर घातली.  दिवसाच्या सुरुवातीलाच बुमराहनं आणि अश्विन यानं इंग्लंड संघाचे उर्वरित दोन गडी बाद करत ५७८ धावांवर इंग्लंडला रोखलं. दरम्यान, जो रूट आणि बेन स्टोक्स यांनी दुसऱ्या दिवसाच्या खेळाची सुरूवात केली. पहिल्या सत्रात या दोघांनी ९२ धावांची भर घातली. त्यानंतर दुसऱ्या सत्रात स्टोक्सने अर्धशतक तर स्टोक्सने दीडशतक ठोकलं. बेन स्टोक्स फटकेबाजी करत असताना झेलबाद झाला. त्याने १० चौकार आणि ३ षटकार खेचले. रूटने मात्र लय कायम राखत द्विशतक झळकावले. १००व्या कसोटी सामन्यात द्विशतक ठोकणारा तो पहिला क्रिकेटपटू ठरला. रूट १९ चौकार २ षटकारांसह २१८ धावांवर बाद झाला. त्यानंतर पोप (३४), बटलर (३०) हे झटपट बाद झाले.  त्याआधी, नाणेफेक जिंकून इंग्लंडने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सलामीवीर रॉरी बर्न्स ६० चेंडूत ३३ धावा काढून बाद झाला. त्यानंतर नवखा डॅन लॉरेन्सदेखील शून्यावर बाद झाला. त्याला बुमराहने पायचीत केले. पण त्यानंतर जो रूट आणि सिबलीने २०० धावांची भागीदारी केली. सिबली ८७ धावांवर पायचीत झाला आणि पहिल्या दिवसाचा खेळ थांबवण्यात आला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 7, 2021 10:32 am

Web Title: ind vs eng england are bowled out for 578 nck 90
टॅग : India Vs England
Next Stories
1 श्रेयस अय्यरचा निर्णय १० फेब्रुवारीला
2 हजारे क्रिकेट स्पर्धा २० फेब्रुवारीपासून
3 राष्ट्रीय ग्रीको-रोमन कुस्ती स्पर्धा : राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ जाहीर
Just Now!
X