X

‘टीम इंडिया’वर चाल करून येण्याआधी अँडरसनचा श्रीलंकेत कहर

वेगवान मारा करत मोडला ग्लेन मॅकग्राचा विक्रम

भारतीय संघाची ५ फेब्रुवारीपासून इंग्लंडविरूद्ध कसोटी मालिका सुरू होणार आहे. या मालिकेआधी सध्या इंग्लंडचा संघ श्रीलंकेत कसोटी मालिका खेळत आहे. मालिकेतील पहिला सामना इंग्लंडने जिंकला असून दुसरा सामना गॉलच्या मैदानावर सुरू आहे. २२ ते २६ जानेवारी या कालावधीत हा सामना रंगत असून त्यात श्रीलंकेने पहिल्या डावात ३८१ धावा केल्या. या डावात इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने धमाकेदार कामगिरी करत ऑस्ट्रेलियाचा महान गोलंदाज ग्लेन मॅकग्रा याचा विक्रम मोडला.

IPL 2021 : ‘हा’ ठरेल यंदाचा सर्वात महागडा खेळाडू!

जेम्स अँडरसनने पहिल्या डावात श्रीलंकेचे ४० धावांत ६ गडी माघारी धाडले. वाऱ्याच्या वेगाने गोलंदाजी करत त्याने श्रीलंकन फलंदाजांना पळता भुई थोडी केली. कसोटी क्रिकेटमध्ये ३० वेळा पाच गडी घेण्याचा पराक्रम अँडरसनने केला. अँडरसनने निरोशन डिकवेला, सुरंगा लकमल, अँजलो मॅथ्यूज, कुसल परेरा आणि लाहिरू थिरिमने यांना बाद करून आपले पाच बळी पूर्ण केले. याचसोबत कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा डावात ५ बळी घेण्याचा ग्लेन मॅकग्राचा (२९) विक्रम त्याने मोडीत काढला.

याशिवाय, आशिया खंडात अँडरसनने दुसऱ्यांदा डावात ५ गडी टिपण्याची किमया साधली. याआधी २६ मार्च २०१२ला श्रीलंकाविरुद्धच कसोटी सामन्यात त्याने पाच गडी टिपले होते. मात्र त्या सामन्यात इंग्लंडला ७५ धावांनी पराभव पत्करावा लागला होता.

21
READ IN APP
X