भारताचा कर्णधार विराट कोहली कसोटी क्रमवारी पुन्हा एकदा अव्वल स्थानी विराजमान झाला आहे. पहिल्या कसोटीमध्ये दमदार कामगिरी करत अव्वल स्थान मिळेवलेले दुसऱ्या कसोटीतील निराशजनक कामगिरीमुळे विराट कोहलीने अव्वल स्थान गमावले होते. तिसऱ्या कसोटी सामन्यात विराट कोहलीने पहिल्या डावात ९७ आणि दुसऱ्या डावात १०३ धावांची खेळी करत संघाच्या विजयाचा पाया रचला होता. विराट कोहलीने या कामगिरीच्या बळावर कसोटीमध्ये अव्वल स्थान मिळवले आहे.

दुसऱ्या कसोटीतील केलेल्या २०० धावांच्या बळावर विराटने १८ गुणाची कमाई केली. १८ गुणासह विराट कोहलीच्या खात्यावर ९३७ गुण जमा झाले आहेत. स्मिथवर आयसीसीने एका वर्षांनी बंदी घातली आहे. त्यामुळे तो वर्षभर आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रिकेट खेळू शकणार नाही. पण सध्याच्या घडीला तो ९२९ गुणांसह दुसऱ्या स्थानवर आहे.

 

दुसरीकडे हार्दिक पांड्याने अष्टपैलू कामगिरीच्या बळावर कसोटी क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे. पाच विकेट आणि ५२ धावांच्या खेळीच्या बळावर हार्दिकने २३ स्थानाची झेप घेत ५१ व्या क्रमांकावर विराजमान झाला आहे. हार्दिकच्या नावावर ३४० गुण जमा आहेत.