England tour of india 2021 : भारतीय कर्णधार विराट कोहली आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह इंग्लंडसाठी धोकादायक नसल्याचं इंग्लंडचा माजी दिग्गज फिरकीपटू माँटी पानेसर यानं म्हटलं आहे. पानेसरच्या मते विराट-बुमराह वगळता तीन भारतीय खेळाडू इंग्लंड संघासाठी डोकेदुखी ठरु शकतील. यामध्ये रविचंद्रन अश्विन, उप कर्णधार अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा यांचा समावेश आहे.

पनेसर म्हणाला की, इंग्लंडसाठी जो रूट, स्टुअर्ट ब्रॉड आणि जेम्स अँडरसन यांचं योगदान महत्वाचं ठरणार आहे. या तिघांच्या कामगिरीवर मालिकेतील इंग्लंड संघाचं अस्तित्व अबाधित राहणार आहे. जो रुट सध्या तुफान फॉर्मात असून भारतीय खेळपट्या आणि परिस्थितीत कशी फलंदाजी करायची हे माहित आहे. जो रुटला एलिस्टर कुकप्रमाणेच कारनामा लागेल. रूटला भारतीय खेळपट्यावर तळ ठोकून राहावं लागेल.

आणखी वाचा- IND vs ENG : कसोटी मालिकेच्या निकालाबद्दल गौतमची गंभीर भविष्यवाणी, म्हणाला…

पनेसर म्हणाला की, “अजिंक्य रहाणेच्या फलंदाजी आणि नेतृत्व कौशल्यानं मला प्रभावीत केलं आहे. चेतेश्वर पुजारा प्रतिस्पर्धी संघावर दबाव निर्णाण करण्यास सक्षण आहे. अश्विन या मालिकेत भारताकडून मोलाची कामगिरी बजावेल. अश्विन स्टम्पाच्या दोन्ही बाजूनं गोलंदाजी करुन बळी घेण्यास सक्षम आहे. अश्विनकडे गोलंदाजीतील विविध शैली असून एक चतूर फिरकी गोलंदाज आहे. अश्विन मला म्हणाला होता की, फिरकी गोलंदाजी एखाद्या अॅपसारखी असते. प्रत्येक सहा महिन्याला त्याला अपडेट करावी लागते. अश्विन आपल्या गोलंदाजी सातत्यानं बदल करत आला आहे. त्यामुळे तो सर्वात यशस्वी फिरकी गोलंदाज आहे. ”

आणखी वाचा- ‘विराट’ विक्रमासाठी सज्ज… धोनीचा मोठा विक्रम मोडण्याच्या तयारीत कोहली

चेन्नई येथे पाच फेब्रुवारीपासून भारत आणि इंग्लंड यांच्यादरम्यान कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. पहिले दोन सामने चेन्नई येथे तर उर्वरित दोन सामने अहमदाबाद येथील मैदानावर होणार आहेत. चेन्नई येथे दोन्ही संघानं कसून सरावाला सुरुवात केली आहे. अहमदाबाद येथे होणारा मालिकेतील तिसरा सामना दिवसरात्र कसोटी सामना असणार आहे.