नुकत्याच संपलेल्या भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यानंतर ICC अर्थात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने कसोटीमधील रँकिंग जाहीर केली आहे. यामध्ये रँकिंगमध्ये सर्वाधिक सुधारणा झालेला भारतीय क्रिकेटपटू शार्दूल ठाकूर ठरला आहे! शार्दूल ठाकूरनं ओव्हलवर झालेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यामध्ये चमकदार कामगिरी केली. फलंदाजी आणि गोलंदाजी अशा दोन्ही आघाड्यांवर शार्दूलनं केलेल्या याच कामगिरीच्या जोरावर त्यानं कसोटी क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे. शार्दूलसोबतच इंग्लंडचा फलंदाज ओली पोप यानं देखील क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे.

ICC नं नुकत्याच जाहीर केलेल्या Test Ranking मध्ये शार्दूल ठाकूरनं १३८व्या स्थानावरून फलंदाजीमध्ये थेट ७९व्या क्रमांकावर झेप घेतली आहे. ओव्हलच्या कसोटीमध्ये दोन्ही डावांमध्ये शार्दूल ठाकूरनं अर्धशतक झळकावून महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्याचाच परिणाम म्हणून त्याच्या फलंदाजीच्या क्रमवारीमध्ये सुधारणा झाली आहे.

IPL 2024 Mumbai Indians vs Chennai Super Kings Match Updates in Marathi
IPL 2024: लवकरच सगळेजण हार्दिक पंड्याचे गोडवे गातील; कायरॉन पोलार्ड हार्दिकच्या मागे भक्कम उभा
IPL 2024 Mumbai Indians vs Royal Challengers Bangalore Match Updates in Marathi
IPL 2024: बुमराह वि कोहलीमध्ये जसप्रीतने मारली बाजी, आयपीएलमध्ये पाचव्यांदा केलं विराटला आऊट, पाहा VIDEO
Sunil Narine's 500th T20 Match
RCB vs KKR : सुनील नरेनने आरसीबीविरुद्ध रचला इतिहास, टी-२०मध्ये ‘हा’ पराक्रम करणारा ठरला जगातील चौथा खेळाडू
md siraj
बंगळुरूच्या गोलंदाजांकडून कामगिरीत सुधारणेची अपेक्षा! ‘आयपीएल’मध्ये आज पंजाब किंग्जचे आव्हान

 

दुसरीकडे गोलंदाजीमधअये देखील शार्दूल ठाकूर यानं ५६ वरून ४९व्या स्थानी झेप घेतली आहे. ओव्हलमधील कसोटीमध्ये शार्दूलनं पहिल्या डावात एक तर दुसऱ्या डावात दोन बळी घेतले होते. दोन्ही डावांमध्ये मिळून शार्दूलनं २३ षटकांमध्ये फक्त ७६ धावा दिल्या होत्या.

 

ICC T20 World Cup 2021: सुनील गावस्कर यांनी निवडला संघ; धवन, अय्यरला स्थान नाही तर ओपनर म्हणून रोहितसोबत…

एकीकडे शार्दूल ठाकूरने क्रमवारीत घसघशीत वाढ केली असताना भारताचा सलामीवीर रोहित शर्मानं सामनावीराची खेळी करताना केलेल्या १२७ धावांच्या जोरावर आपलं पाचवं स्थान कायम राखलं आहे. कर्णधार विराट कोहली अजूनही सातव्या स्थानावर कायम आहे. त्यासोबत भारताचा जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराह यानं एका स्थानाची कमाई करत १०व्या स्थानावरून ९व्या स्थानावर झेप घेतली आहे. ओव्हल कसोटीमध्ये जसप्रीत बुमराहनं दोन्ही डावांमध्ये प्रत्येकी २ बळी घेतले होते.