News Flash

Ind vs Eng T20 : पदार्पणातच सूर्यकुमारचं दमदार अर्धशतक! ५७ धावांची झंझावाती खेळी!

तिसऱ्या टी-२० सामन्यात पराभवाचा सामना करणाऱ्या टीम इंडियासाठी चौथ्या सामन्यात करो वा मरोची परिस्थिती होती. यासाठी टीम इंडियानं सूर्यकुमार यादवला वरच्या क्रमांकावर खेळण्याची संधी दिली.

suryakumar yadav
सूर्यकुमार यादवचं पदार्पणातच तडाखेबाज अर्धशतक (फोटो - बीसीसीआय ट्वीटर)

तिसऱ्या टी-२० सामन्यात पराभवाचा सामना करणाऱ्या टीम इंडियासाठी चौथ्या सामन्यात करो वा मरोची परिस्थिती होती. यासाठी टीम इंडियानं सूर्यकुमार यादवला वरच्या क्रमांकावर खेळण्याची संधी दिली. या संधीचं पुरेपूर सोनं करत सूर्यकुमार यादवनं टी-२० पदार्पणाच्या सामन्यातच तडाखेबाज अर्धशतक झळकावत आपल्या कर्णधारासोबतच तमाम भारतीय क्रिकेट चाहत्यांची मनं जिंकली. याच मालिकेमध्ये भारताचा अजून एक फलंदाज इशान किशननं दुसऱ्या सामन्यात आपल्या टी-२० पदार्पणातच दमदार अर्धशतक झळकावून सामना भारताच्या बाजूने झुकवला होता.

डावाच्या सुरुवातीला सलामीला रोहित शर्मा आणि के. एल. राहुल या दोघांनी आश्वासक सुरुवात केली. मात्र, १२ धावांवर असताना रोहित शर्मानं जोफ्रा आर्चरला त्याच्याच गोलंदाजीवर कॅच दिला आणि भारताला २१ धावांवरच पहिला धक्का बसला. पण त्यानंतर आलेल्या सूर्यकुमार यादवनं सुरुवातीपासूनच आत्मविश्वास आणि आक्रमक खेळी करत इंग्लंडच्या गोलंदाजांचं अजिबात दडपण घेतलं नाही. आपल्या पेटाऱ्यातून एक सो एक फटके काढून त्यानं आपल्या धावांची गती सातत्याने वाढवत नेली.

सूर्यकुमार तळपला, आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची षटकाराने केली सुरुवात

आपल्या पहिल्या वहिल्या आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकून सूर्यकुमार यादवनं आपण मैदानात काय करायला उतरलो आहोत, याचाच संदेश इंग्लंडच्या गोलंदाजांना दिला होता. त्याची अवघ्या ३१ धावांमध्ये ५७ धावांची खेळी अशाच दमदार फटक्यांनी सजली होती. यामध्ये ६ चौकार आणि ३ उत्तुंग षटकारांचा समावेश होता. सूर्यकुमार यादवचा मलाननं घेतलेला झेल वादग्रस्त ठरला. मात्र, ऑनफिल्ड अंपायरनं आऊट दिल्यामुळे थर्ड अंपायरने देखील त्याला बाद दिलं आणि त्याची झंझावाती खेळी संपुष्टात आली.

Video : मी आहे ना ! मैदानातील ‘त्या’ राड्यानंतर सूर्यकुमारने हार्दिकला केलं शांत

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 18, 2021 9:00 pm

Web Title: ind vs eng t20 fourth match suryakumar yadav half century on debut match pmw 88
टॅग : Cricket,Indian Cricket
Next Stories
1 सूर्यकुमार तळपला, आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची षटकाराने केली सुरुवात
2 IND vs ENG : शार्दूल ठाकूरच्या एकाच ओव्हरमध्ये २ विकेट! मॅच रंगतदार स्थितीत!
3 चॅम्पियन्स लीग: बायर्न म्युनिक आणि चेल्सी क्वार्टरफायनलमध्ये
Just Now!
X