चेन्नई येथे सुरु असलेल्या कसोटी सामन्यात भारतीय गोलंदाजांनी निराशाजनक कामगिरी केली आहे. इंग्लंड संघानं प्रथम फलंदाजी करताना ५७८ धावांचा डोंगर उभा केला. जो रुटनं द्विशतकी खेळी करत इंग्लंडचा धावांचा डोंगर उभा केला. भारतीय गोलंदाजांना विकेट घेण्यात अपयश आलेच त्याशिवाय तब्बल २० चेंडू नो टाकले. मागील दहावर्षांत भारतीय संघानं टाकलेले हे सर्वाधिक नो बॉल आहेत. चेन्नई कसोटीत बुमराहने सर्वाधिक ७ नो-बॉल टाकले, नदीमने ६, इशांतने ५ तर अश्विनने २ नो-बॉल टाकले.

कसोटी क्रिकेटच्या इहिसात कोणत्याही संघानं टाकलेले हे सर्वाधिक दुसऱ्या क्रमांकाचे नो बॉल आहेत. २०१० मध्ये कोलोबों येथील कसोटी सामन्यात श्रीलंकेविरोधात १६ नो बॉल टाकले होते. भारतीय गोलंदाजांनी आपलाच हा विक्रम मोडीत काढला आहे. २०१० मध्ये भारतीय संघानं श्रीलंकेचा पराभव केला होता. २०१४ मध्ये बांगलादेशविरोधात श्रीलंका संघानं सर्वाधिक नो बॉल टाकले आहेत. श्रीलंका संघानं २१ नो बॉल टाकण्याचा पराक्रम केला होता.

पहिल्या डावात इंग्लंडच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांचा चांगलाच समाचर घेतला. फिरकीपटू शाहबाज नदीम, आर अश्विन आणि वॉशिंग्टन सुंदर यांना इंग्लंडच्या फंलदाजांनी झोडपलं. नदीमने 167, अश्विन 146 आणि सुंदरने 98 धावा दिल्या.