भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या मालिकेत पहिली कसोटी इंग्लंडने तर दुसरी कसोटी भारताने जिंकली. मालिका १-१ अशा बरोबरीत असताना उर्वरित दोन कसोटी सामना अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियममध्ये खेळले जाणार आहेत. मोटेरा येथे खेळवण्यात येणाऱ्या उर्वरित दोन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघात वेगवान गोलंदाज उमेश यादवचा समावेश करण्यात आला आहे; परंतु त्यापूर्वी संघात स्थान मिळवण्यासाठी त्याला तंदुरुस्ती चाचणीचा अडथळा ओलांडणे अनिवार्य आहे. अन्यथा उमेश यादवला संघात स्थान मिळणं कठीण आहे. २४ फेब्रुवारीपासून तिसरा कसोटी सामना सुरु होणार आहे.

उमेश यादव यानं तंदुरुस्ती चाचणी यशस्वी पार पाडल्यासच संघात स्थान मिळू शकते. सामन्यापूर्वी उमेश यादव याची तंदुरुस्ती चाचणी होणार आहे. स्नायूंच्या दुखापतीमुळे उमेश यादव ऑस्ट्रेलियात कसोटी सामन्याला मुकला होता. परंतु उमेश मात्र स्नायूंच्या दुखापतीतून सावरला आहे. तिसऱ्या कसोटीपूर्वी त्याची तंदुरुस्ती चाचणी घेण्यात येईल, असं बीसीसीआयच्या एका सुत्रानं सांगितलं आहे.

भारतीय संघ

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शुभमन गिल, मयांक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), के. एल. राहुल, हार्दिक पंडय़ा, ऋषभ पंत (यष्टिरक्षक), वृद्धिमन साहा (यष्टिरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, इशांत शर्मा, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जसप्रीत बुमरा.

* राखीव खेळाडू : के. एस. भरत, राहुल चहर