भारताविरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडच्या संघाने दुसऱ्या दिवसअखेर ८ बाद ५५५ धावांपर्यंत मजल मारली. कर्णधार जो रूटचे दमदार द्विशतक आणि डॉम सिबली, बेन स्टोक्स यांची अर्धशतके यांच्या जोरावर इंग्लंडने धावांचा डोंगर उभारला. पहिल्या दोन सत्रांवर इंग्लंडने पूर्णपणे वर्चस्व राखल्यानंतर शेवटच्या सत्रात भारतीय गोलंदाजांना काहीसं यश मिळालं. इशांत शर्मा सलग दोन चेंडूंवर उडवलेले दोन त्रिफळे चर्चेचा विषय ठरला.

जो रूटचा ‘टीम इंडिया’ला दणका; इंग्लंडने उभारला धावांचा डोंगर

जो रूट-ओली पोप जोडी माघारी गेल्यानंतर जोस बटलर-डॉम बेस जोडीने भागीदारी रचण्यास सुरूवात केली. पण इशांत शर्माच्या अनुभवापुढे जोस बटलर फिका पडला. एक इनस्विंगर चेंडू सोडून देताना तो त्रिफळाचीत झाला. चेंडू बाहेरच्या दिशेने जाईल अशी बटलरला अपेक्षा होती, पण चेंडू आत वळला आणि थेट स्टंपवर लागला. त्यानंतर पुढच्याच चेंडूवर जोफ्रा आर्चरलादेखील काहीही कळायच्या आत तो त्रिफळाचीत झाला. पण नंतर बेस आणि लीच यांनी डाव सांभाळला.

पाहा व्हिडीओ-

त्याआधी, इंग्लंडकडून जो रूट आणि बेन स्टोक्स यांनी दमदार खेळी केल्या. बेन स्टोक्स फटकेबाजी करत असताना झेलबाद झाला. त्याने ८२ धावा केल्या. रूटने मात्र दमदार द्विशतक ठोकलं. १९ चौकार २ षटकारांसह त्याने २१८ धावा केल्या. सलामीवीर सिबलीनेही ८७ धावांची दमदार खेळी केली.