27 January 2021

News Flash

Ind vs Eng : …आणि न रहावून ‘विरूष्का’ने काढला त्याच्याबरोबर फोटो

भारतीय खेळाडू आपल्या साथीदारांबरोबर आणि कुटुंबीयांबरोबर वेळ घालवताना दिसत आहेत. विराट आणि अनुष्का ही जोडीदेखील यात मागे राहिलेली नाही.

विराट-अनुष्का

Ind vs Eng : इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारताने तिसरा कसोटी सामना जिंकून पाच सामन्यांच्या मालिकेतील आव्हान १-२ असे कायम राखले. या सामन्यात कर्णधार विराट याने अत्यंत उल्लेखनीय कामगिरी केली. त्याने पहिल्या डावात ९७ तर दुसऱ्या डावात १०३ धावा केल्या. त्याच्या या फलंदाजीच्या जोरावर कसोटी क्रमवारीत तो पुन्हा एकदा अव्वल स्थानी विराजमान झाला. याशिवाय, त्याने पहिल्या सामन्याच्या पहिल्या डावातही शतक ठोकले होते.

२०१४मध्ये कोहलीला इंग्लंड दौऱ्यात अपयश आले होते. ते अपयश मागे सोडून तो यंदाच्या दौऱ्यात उत्तम कामगिरी करत आहे. त्याच्या आतापर्यंत ४००हून अधिक धावा झाल्या असून तो सध्या मालिकेतील सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. या मालिकेचा चौथा सामना ३० ऑगस्टपासून सुरू होत आहे.

या दरम्यान, भारतीय खेळाडू आपल्या साथीदारांबरोबर आणि कुटुंबीयांबरोबर वेळ घालवताना दिसत आहेत. विराट आणि अनुष्का ही जोडीदेखील यात मागे राहिलेली नाही. दरम्यानच्या काळात ते देखील भ्रमंती करत आहेत. या भ्रमंतीच्या वेळी त्यांना एक फोटो काढण्यापासून मोह आवरला नाही.

इंग्लंड दौऱ्याला सुरूवात झाल्यापासून विराटची पत्नी अनुष्का शर्मा लंडनमध्ये आहे. पती विराटला चिअर करण्यासाठी ती स्टेडियमवरही उपस्थित राहत आहे. विश्रांतीचा दिवस असल्याने या जोडीने शनिवारी लंडनमध्ये भ्रमंती केली. तेव्हा त्यांना एका मॉलमध्ये एक असा पाहुणा दिसला कि त्याच्या बरोबर फोटो काढण्याचा मोह या दोघांना आवरला नाही. या दोघांनी त्याच्याबरोबर फोटो काढला आणि तो फोटो सोशल मीडियावर शेअर केला.

या फोटोसाठी अत्यंत शांतपणे पोझ दिल्याबद्दल विराटने त्या खास पाहुण्याचे कौतुकही केले. या फोटोला ट्विटरवर ९३ हजाराहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 25, 2018 6:54 pm

Web Title: ind vs eng virat anushka clicked photo with adorable dog
Next Stories
1 Asian Games 2018 : पर्यायी खेळाडू म्हणून आली आणि केले २९ मिनिटात ९ गोल
2 Asian Games 2018 : Google Search Trends मध्ये राही सरनौबत, विनेश फोगट, सौरभ चौधरी अव्वल
3 Ind vs Eng : …म्हणून कसोटी पदार्पण माझ्यासाठी सोपं ठरलं – ऋषभ पंत
Just Now!
X