भारत विरुद्ध न्यूझीलंड टी-२० मालिकेत, भारताने ५-० ने विजय मिळवत आपल्या पहिल्या परदेश दौऱ्याची धडाकेबाज सुरुवात केली. बुधवारपासून दोन्ही संघांमध्ये वन-डे मालिकेला सुरुवात झालेली आहे. हॅमिल्टनच्या मैदानावर पहिल्या वन-डे सामन्यात भारतीय संघाकडून पृथ्वी शॉ आणि मयांक अग्रवाल ही जोडी सलामीला फलंदाजीला येणार आहे. २०१६ नंतर पहिल्यांदाच वन-डे क्रिकेटमध्ये पूर्णपणे नवीन जोडी भारतीय संघासाठी सलामीला येत आहे. २०१६ साली झिम्बाब्वेविरुद्ध लोकेश राहुल आणि करुण नायर हे फलंदाज सलामीला आले होते.

न्यूझीलंडविरुद्ध टी-२० मालिकेत दुखापतग्रस्त झाल्यामुळे रोहित शर्माला आपलं संघातलं स्थान गमवावं लागलं होतं. त्याच्या जागेवर मयांक अग्रवालला संधी देण्यात आली. त्याआधी शिखर धवनही दुखापतीमुळे संघाबाहेर गेला होता, ज्यामुळे मुंबईकर पृथ्वी शॉला भारतीय संघात स्थान देण्यात आलं होतं.

दरम्यान ३ वन-डे सामन्यांच्या मालिकेनंतर भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध २ कसोटी सामन्यांची मालिका खेळेल.

अवश्य वाचा – Ind vs NZ : एका क्लिकवर जाणून घ्या भारताचा कसोटी संघ…