केन विल्यमसनच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंड संघाला पहिल्या टी-२० सामन्यात पराभवाला सामोरं जावं लागलं. विराट कोहलीच्या भारतीय संघाने न्यूझीलंडने विजयासाठी दिलेलं २०४ धावांचं आव्हान ६ गडी राखत पूर्ण केलं. या विजयासह भारताने मालिकेत १-० अशी आघाडीही घेतली आहे. यजमान संघाने हा सामना गमावला असला तरीही कर्णधार केन विल्यमसनच्या नावे या सामन्यात एक विक्रम जमा झाला आहे.

आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये कर्णधार या नात्याने सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत विल्यमसनने भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीला मागे टाकलं आहे.

कर्णधार म्हणून आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे खेळाडू –

  • फाफ डु-प्लेसिस – १ हजार २७३ धावा
  • केन विल्यमसन – १ हजार १३४ धावा
  • महेंद्रसिंह धोनी – १ हजार ११२ धावा
  • विराट कोहली – १ हजार ७७ धावा
  • ओएन मॉर्गन – १ हजार १३ धावा

प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडकडून विलियम्सनने २६ चेंडूत ५१ धावा केल्या. यामध्ये ४ चौकार आणि ४ षटकारांचा समावेश होता. यामुळे तो आता आंतरराष्ट्रीय टी20मध्ये कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा करणाऱ्या क्रिकेटपटूंच्या यादीत धोनीला मागे टाकत दुसऱ्या क्रमांकावर आला आहे.

अवश्य वाचा – Ind vs NZ : पहिल्या टी-२० सामन्यात घडला अनोखा विक्रम, जाणून घ्या…