नवीन वर्षात विराट कोहलीच्या भारतीय संघाने आपल्या परदेश दौऱ्याची सुरुवात धडाकेबाज पद्धतीने केली आहे. ऑकलंडच्या मैदानावरील पहिल्या टी-२० सामन्यात भारताने न्यूझीलंडवर ६ गडी राखून मात केली. सलामीवीर श्रेयस अय्यर आणि मुंबईकर श्रेयस अय्यरने या सामन्यात फटकेबाजी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. श्रेयसने या सामन्यात २९ चेंडूत ५ चौकार आणि ३ षटकारांसह नाबाद ५८ धावा केल्या.

अवश्य वाचा –  Ind vs NZ : चर्चा तर होणारच ना ! टीम इंडियाची टी-२० क्रिकेटमध्ये अनोखी कामगिरी

श्रेयसला त्याच्या या आक्रमक खेळासाठी सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं. याचसोबत श्रेयस न्यूझीलंड विरुद्ध आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यात सामनावीर पुरस्कार मिळवणारा चौथा भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे. याआधी शिखर धवन, जसप्रीत बुमराह आणि कृणाल पांड्या यांनी सामनावीर पुरस्कार पटकावला आहे.

दरम्यान, भारतीय डावाची सुरुवात खराब झाली, सलामीवीर रोहित शर्मा स्वस्तात माघारी परतला. मात्र यानंतर लोकेश राहुल आणि कर्णधार विराट कोहली यांनी संयमी भागीदारी करत संघाचा डाव सावरला. दोन्ही फलंदाजांनी योग्य चेंडूवर फटकेबाजी करत संघाची अधिक पडझड होणार नाही याची काळजी घेतली. लोकेश राहुलने यादरम्यान आपलं अर्धशतकही साजरं केलं. ५६ धावांवर राहुल इश सोधीच्या गोलंदाजीवर माघारी परतला. यानंतर कर्णधार विराट कोहलीने संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला, मात्र मोक्याच्या षटकांमध्ये विराट माघारी परतला. यानंतर श्रेयस अय्यर आणि मनिष पांडे यांनी अखेरच्या षटकांमध्ये फटकेबाजी करत संघाला विजय मिळवून दिला.