बोल्ट, जेमिसन आणि साऊदीच्या माऱ्यासमोर वेलिंग्टन कसोटीत भारतीय फलंदाजांची अक्षरशः त्रेधातिरपीट उडाली. नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा कर्णधार केन विल्यमसनचा निर्णय त्याच्या गोलंदाजांनी सार्थ ठरवला. पृथ्वी शॉ, चेतेश्वर पुजारा आणि कर्णधार विराट कोहली हे फलंदाज झटपट माघारी परतले.

मात्र भारतीय संघाचा उप-कर्णधार अजिंक्य रहाणेने मात्र यानंतर मयांक अग्रवाल, हनुमा विहारी आणि ऋषभ पंत यांच्यासोबत भागीदारी रचत भारतीय संघाचा डाव सावरला. पहिल्या दोन सत्रांमध्ये भारतीय डावावर नियंत्रण ठेवण्यात अजिंक्य रहाणेने बाजी मारली आहे. अजिंक्यने मयांकसोबत ४८ धावांची भागीदारी रचली.

आणखी वाचा – Ind vs NZ : तब्बल ३० वर्षांनी मयांकने केली कोणालाही न जमलेली कामगिरी

पहिल्या दिवशी चहापानाच्या सत्रानंतर भारतीय संघाने ५ गड्यांच्या मोबदल्यात १२२ धावांपर्यंत मजल मारली.