News Flash

Ind vs NZ : भारताची डोकेदुखी ठरलेल्या जेमिसनचा फलंदाजीतला हा विक्रम माहिती आहे का??

वेलिंग्टन कसोटीत भारत पराभूत

भारताविरुद्ध वेलिंग्टन कसोटी सामन्यात यजमान न्यूझीलंडने अष्टपैलू खेळ केला. नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या न्यूझीलंडने भारतीय संघाला १६५ धावांत गुंडाळलं. यानंतर प्रत्युत्तरादाखल धडाकेबाज फलंदाजी करत पहिल्या डावात ३४८ धावांपर्यंत मजल मारत १८३ धावांची आघाडी घेतली.

अवश्य वाचा – Ind vs NZ : वेलिंग्टन कसोटीत टीम साऊदीचं त्रिशतक

न्यूझीलंडकडून पहिल्या डावात कर्णधार केन विल्यमसन, रॉस टेलर, कॉलिन डी-ग्रँडहोम, कायल जेमिसन आणि ट्रेंट बोल्ट यांनी चांगली फलंदाजी केली. आपला पहिला कसोटी सामना खेळणाऱ्या जेमिसनने गोलंदाजीसोबत फलंदाजीतही चमक दाखवली. पहिल्या डावात जेमिसनने ४४ धावांची खेळी करत एक खास विक्रम केला आहे.

कसोटी पदार्पणात सर्वाधिक षटकार खेचणाऱ्या खेळाडूंच्या यादीत आता जेमिसनला स्थान मिळालं आहे –

  • मायकल क्लार्क विरुद्ध भारत – ४ षटकार (१५१ धावा, वर्ष २००४)
  • काइल जेमिसन विरुद्ध भारत – ४ षटकार (४४ धावा, वर्ष २०२०)

याव्यतिरीक्त न्यूझीलंडकडून कसोटी पदार्पणात नवव्या क्रमांकावर फलंदाजी करताना सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीतही जेमिसनने पहिला क्रमांक पटकावला आहे. पहिल्या डावात जेमिसनने डी-ग्रँडहोमसोबत महत्वपूर्ण भागीदारी रचली. जेमिसनने ४५ चेंडूत १ चौकार आणि ४ षटकारांसह ४४ धावा केल्या.

अवश्य वाचा – Ind vs NZ : वेलिंग्टन कसोटीत न्यूझीलंडकडून भारताचा धुव्वा, १० गडी राखत जिंकला सामना

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 24, 2020 5:53 am

Web Title: ind vs nz 1st test kyle jamieson creates record in batting psd 91
टॅग : Ind Vs Nz
Next Stories
1 Ind vs NZ : वेलिंग्टन कसोटीत टीम साऊदीचं त्रिशतक
2 Ind vs NZ : वेलिंग्टन कसोटीत न्यूझीलंडकडून भारताचा धुव्वा, १० गडी राखत जिंकला सामना
3 T20 WC 2020 : भारतासमोर बांगलादेशचे आव्हान