कर्णधार केन विल्यमसनचं अर्धशतक आणि त्याला अनुभवी रॉस टेलरने दिलेली उत्तम साथ या जोरावर न्यूझीलंडने वेलिंग्टन कसोटीत पहिल्या डावात आघाडी घेतली आहे. भारतीय संघाला १६५ धावांत गारद केल्यानंतर न्यूझीलंडने दुसऱ्या दिवसाअखेरीस ५ गड्यांच्या मोबदल्यात २१६ धावांपर्यंत मजल मारली आहे. सध्याच्या घडीला न्यूझीलंडकडे ५१ धावांची आघाडी आहे.

अवश्य वाचा – Ind vs NZ : पहिल्या डावात न्यूझीलंडला आघाडी, इशांत शर्माची एकाकी झुंज

दरम्यान दुसऱ्या दिवसाच्या खेळात, भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने दिग्गज भारतीय खेळाडूंच्या पंगतीत स्थान मिळवलं आहे. रविचंद्रन आश्विनच्या गोलंदाजीवर विराट कोहलीने स्लिपमध्ये हेन्री निकोल्सचा झेल पकडला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधला कोहलीचा हा २५० वा झेल ठरला. यासह विराट कोहलीने अझरुद्दीन-द्रविड आणि सचिन यांच्या पंगतीत स्थान मिळवलं आहे.

कर्णधार केन विल्यमसन आणि रॉस टेलरने फटकेबाजी करत न्यूझीलंडला आघाडी मिळवून देण्यात मदत केली. तिसऱ्या विकेटसाठी ९३ धावांची भागीदारी करणाऱ्या रॉस टेलरचं अर्धशतक ६ धावांनी तर कर्णधार केन विल्यमसनचं शतक ११ धावांनी हुकलं. भारताकडून इशांत शर्माने दुसऱ्या दिवसाच्या अखेरीस ३ तर मोहम्मद शमी आणि रविचंद्रन आश्विनने प्रत्येकी १-१ बळी घेतला. विल्यमसनने ८९ धावा केल्या.

अवश्य वाचा – Video : हवा तेज चलता है, टोपी संभालो ! केन विल्यमसनसोबत घडला मजेशीर प्रसंग