News Flash

Ind vs NZ : विराट कोहलीचा रोहित शर्माला धोबीपछाड

मैदानात विराटची धडाकेबाज कामगिरी

पहिल्या टी-२० सामन्यात न्यूझीलंडने दिलेलं आव्हान यशस्वीपणे पार केलेल्या भारतीय संघाने दुसऱ्या सामन्यातही चांगली कामगिरी केली. दुसऱ्या टी-२० सामन्यात पहिल्यांदा गोलंदाजी करताना भारताने यजमान न्यूझीलंडला १३२ धावांवर रोखलं. रविंद्र जाडेजा, जसप्रीत बुमराह यांनी न्यूझीलंडच्या फलंदाजांच्या धावगतीला वेसण घातली. २० षटकांत न्यूझीलंडचा संघ ५ गड्यांच्या मोबदल्यात १३२ धावांपर्यंत मजल मारु शकला.

अवश्य वाचा – Ind vs NZ : असं काय घडलं की विराटवर आली तोंड लपवण्याची वेळ…

क्षेत्ररक्षणातही भारतीय खेळाडूंची कामगिरी उजवी ठरली. कर्णधार विराट कोहलीने या सामन्यात दोन झेल घेत रोहित शर्माला मागे टाकलं आहे. शार्दुल ठाकूरच्या गोलंदाजीवर विराटने मार्टीन गप्टीलचा सुरेख झेल पकडत, आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक झेल घेणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीत दुसरं स्थान पटकावलं.

आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक झेल घेणारे भारतीय खेळाडू –

१) सुरेश रैना – ४२

२) विराट कोहली – ४१

३) रोहित शर्मा – ४०

दरम्यान सुरेश रैनाला मागे टाकण्यासाठी विराट कोहलीला आणखी दोन झेल घेण्याची गरज आहे. भारताकडून रविंद्र जाडेजाने २ तर शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह आणि शिवम दुबेने प्रत्येकी १-१ बळी घेतला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 26, 2020 3:06 pm

Web Title: ind vs nz 2nd t20i virat kohli breaks rohit sharma record becomes second indian player to take most catches in t20i psd 91
टॅग : Ind Vs Nz,Virat Kohli
Next Stories
1 Ind vs NZ : असं काय घडलं की विराटवर आली तोंड लपवण्याची वेळ…
2 ऋषभ पंत आता कोणालाही दोष देऊ शकणार नाही – कपिल देव
3 पाकिस्तानकडून बहिष्काराचं अस्त्र म्यान, २०२१ टी-२० विश्वचषकासाठी भारतात येणार
Just Now!
X