X
X

Ind vs NZ : पृथ्वी शॉला सूर गवसला; अर्धशतकी खेळीसह सचिनच्या पंगतीत मिळवलं स्थान

READ IN APP

५४ धावा करत पृथ्वी शॉ माघारी

न्यूझीलंडविरुद्ध कसोटी सामन्यात भारतीय संघाने मुंबईकर पृथ्वी शॉला संधी दिली. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत संघात स्थान मिळालेल्या पृथ्वी शॉला वेलिंग्टन कसोटी सामन्यात आपली छाप पाडता आली नाही. पहिला कसोटी सामना भारतीय संघाने गमावला. यानंतर सोशल मीडियावर क्रिकेट चाहत्यांनी दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी शुभमन गिलला संधी देण्यात यावी अशी मागणी केली होती. मात्र भारतीय कर्णधार विराट कोहलीने पृथ्वी शॉची पाठराखण करत दुसऱ्या कसोटी सामन्यातही त्याला संधी दिली.

मुंबईकर पृथ्वी शॉनेही आपल्याला मिळालेल्या संधीचं सोनं करत अर्धशतक झळकावलं. न्यूझीलंडमध्ये कसोटी क्रिकेट सामन्यात अर्धशतक झळकावणारा पृथ्वी दुसरा तरुण भारतीय खेळाडू ठरला आहे.

न्यूझीलंडमध्ये कसोटी क्रिकेट सामन्यात अर्धशतक झळकावणारे तरुण भारतीय फलंदाज –

पृथ्वी शॉने पहिल्या कसोटी सामन्यात्या तुलनेत आश्वासक फलंदाजी करत चांगली फटकेबाजी केली. पृथ्वीने ६४ चेंडूत ८ चौकार आणि एका षटकारासह ५४ धावा केल्या. सलामीवीर मयांक अग्रवाल स्वस्तात माघारी परतल्यानंतर पृथ्वीने दुसऱ्या विकेटसाठी चेतेश्वर पुजारासोबत अर्धशतकी भागीदारी केली.

23
X