News Flash

Video : रविंद्र जाडेजाचा हा भन्नाट झेल पाहिलात का?

सीमारेषेवर टिपला वँगरचा भन्नाट झेल

सलग दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला तळातल्या फलंदाजांनी हैराण केलं. भारतीय संघाने दिलेल्या २४२ धावांचा पाठलाग करताना पहिल्या सत्रापर्यंत न्यूझीलंडने ५ गडी गमावले. यानंतर दुसऱ्या सत्रातही भारतीय गोलंदाजांनी धडाकेबाज सुरुवात करत सामन्यावर आपलं वर्चस्व निर्माण केलं. मात्र तळातल्या फळीतील कॉलिन डी-ग्रँडहोम, कायल जेमिसन आणि निल वँगर या फलंदाजांनी केलेल्या फटकेबाजीच्या जोरामुळे न्यूझीलंडने भारताला मोठी आघाडी घेण्यापासून रोखलं आहे. न्यूझीलंडचा पहिला डाव २३५ धावांत आटोपल्यामुळे, भारताला अवघ्या ७ धावांची आघाडी मिळाली. जेमिसनने फटकेबाजी करत ४९ धावा केल्या.

निल वँगर आणि कायल जेमिसन जोडीने नवव्या विकेटसाठी ५१ धावांची भागीदारी केली. या भागीदारीमुळे यजमानांनी सामन्यात दणक्यात पुनरागमन केलं. अखेरीस मोहम्मद शमीने आपल्या गोलंदाजीवर वँगरला माघारी धाडत न्यूझीलंडची ही जोडी फोडली. सीमारेषेवर रविंद्र जाडेजाने हवेत उडी मारत एका हातात भन्नाट झेल टिपला. हा झेल घेतल्यानंतर भारतीय संघातील सर्व सहकाऱ्यांनी जाडेजाचं कौतुक केलं. पाहा हा व्हिडीओ…

पहिल्या डावात भारताकडून मोहम्मद शमीने ४, जसप्रीत बुमराहने ३, रविंद्र जाडेजाने २ तर उमेश यादवने १ बळी घेतला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 1, 2020 9:15 am

Web Title: ind vs nz 2nd test ravindra jadeja takes stunning catch of nil wenger watch video here psd 91
Next Stories
1 इशांत शर्मा आयपीएलच्या सुरुवातीच्या सामन्यांना मुकण्याची शक्यता
2 Ind vs NZ 2nd Test : दुसऱ्या डावात भारताची घसरगुंडी, ट्रेंट बोल्टचा भेदक मारा
3 चीनच्या बॅडमिंटनपटूंनी आरोग्य अहवाल द्यावा!
Just Now!
X