12 August 2020

News Flash

Ind vs NZ : अय्यरची ही कामगिरी पाहून तुम्हालाही त्याचा अभिमान वाटेल

अखेरच्या सामन्यात झळकावलं अर्धशतक

श्रेयस अय्यर आणि लोकेश राहुलने तिसऱ्या वन-डे सामन्यात केलेल्या संयमी खेळाच्या जोरावर भारताने द्विशतकी धावसंख्येचा टप्पा ओलांडला. श्रेयस अय्यरने या सामन्यात पृथ्वी शॉ आणि लोकेश राहुलसोबत महत्वपूर्ण भागीदारी रचली. ६३ चेंडूत अय्यरने ९ चौकारांसह ६२ धावा केल्या. टीम इंडियात चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करत असताना अय्यरची गेल्या काही सामन्यांमधली कामगिरी ही वाखणण्याजोगी राहिलेली आहे.

अवश्य वाचा – Ind vs NZ : श्रेयस अय्यर चमकला, धोनीच्या विक्रमाशी बरोबरी

३ वन-डे सामन्यांच्या मालिकेत चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करत असताना सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत श्रेयस अय्यरने पहिलं स्थान पटकावलं आहे. यादरम्यान त्याने युवराज सिंह आणि राहुल द्रविडचा विक्रम मोडला.

याचसोबत वन-डे क्रिकेटमध्ये १६ डावांनंतर सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीतही श्रेयस अय्यरने पहिलं स्थान मिळवलं आहे.

श्रेयस मोठी खेळी उभी करणार असं वाटत असतानाच जिमी निशमच्या गोलंदाजीवर झेलबाद होऊन माघारी परतला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 11, 2020 10:51 am

Web Title: ind vs nz 3rd odi shreyes iyer creates several records during his special inning psd 91
Next Stories
1 Ind vs NZ : श्रेयस अय्यर चमकला, धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
2 Ind vs NZ : सलग तिसऱ्या सामन्यात विराट अपयशी
3 U-19 विश्वचषकातला राडा; ICC कडून बांगलादेशी खेळाडूंसह भारतीय खेळाडूंवरही कारवाई
Just Now!
X