News Flash

Ind vs NZ : …आणि मैदानावर झळकलं We Miss You Dhoni चं पोस्टर

टी-२० मालिकेत भारताकडे विजयी आघाडी

न्यूझीलंडविरुद्ध टी-२० सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाने विजयी आघाडी घेतली आहे. चौथ्या टी-२० सामन्यासाठी भारतीय संघाने आपल्या महत्वाच्या खेळाडूंना विश्रांती देत, तरुण खेळाडूंना संधी दिली आहे. या सामन्यात भारतीय संघाची सुरुवात फारशी चांगली झाली नाही, मात्र एक वेगळाच प्रसंग यादरम्यान पहायला मिळाला.

वेलिंग्टनच्या मैदानावर सामना पाहण्यासाठी आलेल्या भारतीय चाहत्यांनी मैदानावर We Miss You Dhoni चं पोस्टर लावत धोनीप्रती असणारं आपलं प्रेम दाखवून दिलं.

२०१९ विश्वचषकात भारतीय संघाचं आव्हान संपुष्टात आल्यानंतर महेंद्रसिंह धोनीला संघात स्थान मिळालेलं नाहीये. मध्यंतरीच्या काळात धोनीच्या निवृत्तीबद्दल अनेक चर्चांना उधाण आलं होतं. आयपीएलनंतर धोनी कदाचित निवृत्ती स्विकारु शकतो असा अंदाज सर्वांनी व्यक्त केला होता. सोशल मीडियावर आजही काही चाहते धोनीला भारतीय संघात स्थान मिळेल या आशेवर असतात. त्यामुळे धोनी आगामी काळात आपल्या निवृत्तीबद्दल नेमका काय निर्णय घेतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 31, 2020 1:17 pm

Web Title: ind vs nz 4th t20i fans shows their love for ms dhoni says we miss you psd 91
टॅग : Ind Vs Nz,Ms Dhoni
Next Stories
1 Ind vs Eng Women’s T20I : भारताचा विजय, ५ विकेट राखून जिंकला सामना
2 Video: आपण बाद झालोय यावर भारतीय फलंदाजाचा विश्वासच बसेना
3 Ind vs NZ : मुंबईकर शार्दुल ठाकूर विजयाचा शिल्पकार, सुपरओव्हरमध्ये भारताची बाजी
Just Now!
X