मुंबईचा जलगती गोलंदाज शार्दुल ठाकूरने वेलिंग्टनच्या मैदानात धडाकेबाज खेळ करत, प्रतिस्पर्धी संघाचा हक्काचा विजय खेचून आणला. विजयासाठी १६६ धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या न्यूझीलंडने सुरुवात चांगली केली. मात्र नवदीप सैनीचं १९ वं षटक आणि शार्दुल ठाकूरच्या अखेरच्या षटकांत केलेल्या हाराकिरीमुळे सामना पुन्हा एका अनिर्णित अवस्थेत सुटला. यानंतर झालेल्या सुपरओव्हरमध्ये भारताने विजयासाठी दिलेलं १४ धावांचं आव्हान सहज पूर्ण करत आपली आघाडी ४-० ने वाढवली.

अखेरचं षटक टाकणाऱ्या शार्दुल ठाकूरला त्याच्या कामगिरीसाठी सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. न्यूझीलंडला विजयासाठी ७ धावांची गरज असताना शार्दुल ठाकूरच्या शेवटच्या षटकाचं पृथक्करण होतं….W, 4, W, 1, W, 1W

“कधीही आशा सोडायची नाही हा मोठा धडा आम्ही शेवटच्या सामन्यातून शिकलो. अखेरच्या षटकात पहिल्या चेंडूवर मिळवलेला बळी हा माझ्यासाठी महत्वाचा होता, याच क्षणानंतर न्यूझीलंडचा संघ बॅकफूटवर गेला.” शार्दुलने आपल्या अखेरच्या षटकाबद्दल बोलत असताना प्रतिक्रीया दिली. दरम्यान या मालिकेतला अखेरचा सामना रविवारी खेळवण्यात येणार आहे. हा सामना जिंकल्यास भारताला न्यूझीलंडला व्हाईटवॉश देण्याची संधी आहे.

अवश्य वाचा – Ind vs NZ : मुंबईकर शार्दुल ठाकूर विजयाचा शिल्पकार, सुपरओव्हरमध्ये भारताची बाजी