भारतीय संघाने पहिल्या वन-डे सामन्यात यजमान न्यूझीलंडवर मात करुन 5 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. भारताला विजयासाठी दिलेलं 156 धावांचं आव्हान शिखर धवन आणि विराट कोहलीने धडाकेबाज अर्धशतकी खेळी करत पूर्ण केलं. विराट कोहली माघारी परतल्यानंतर अंबाती रायुडूने मैदानात येत 23 चेंडूत 13 धावा करत शिखरला मोलाची साथ दिली. या खेळीदरम्यान रायुडूने एक अनोखा विक्रम केला आहे.

धावसंख्येचा पाठलाग करताना (किमान 15 मिनीटं फलंदाजी केल्याचा निकष) सर्वाधिक फलंदाजी सरासरी गाठणाऱ्या खेळाडूंच्या यादीत रायुडूने धोनी आणि विराट कोहलीला मागे टाकलं आहे. आजच्या खेळीत रायुडूने 103.33 च्या सरासरीने धावा काढल्या.

3 बळी घेत वन-डे क्रिकेटमध्ये 100 बळी घेणाऱ्या मोहम्मद शमीला सामनावीराचा किताब देऊन गौरवण्यात आलं. या मालिकेतला दुसरा सामना 26 जानेवारी रोजी होणार आहे.

अवश्य वाचा – IND vs NZ : विराटच्या शिरपेचात मानाचा तुरा, मोडला ब्रायन लाराचा विक्रम