News Flash

IND vs NZ : गांगुली-धोनीला मागे टाकत ‘गब्बर’ने पटकावलं मानाचं स्थान

सर्वात जलद 5 हजार धावा करणारा दुसरा भारतीय फलंदाज

Ind vs NZ 1st ODI : न्यूझीलंड दौऱ्यात पहिल्या वन-डे सामन्यात भारतीय गोलंदाजांनी यजमान संघाला 157 धावांवर रोखलं. कुलदीप यादव आणि मोहम्मद शमीने भेदक मारा करुन किवीजच्या अक्षरशः नाकीनऊ आणले. न्यूझीलंडने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय फलंदाजांनीही आक्रमक सुरुवात केली. रोहित शर्मा आणि शिखर धवन जोडीने उपहाराच्या विश्रांतीपर्यंत भारताला 9 षटकांत 41 धावांपर्यंत मजल मारुन दिली. यादरम्यान शिखर धवनने सौरव गांगुली आणि महेंद्रसिंह धोनीला मागे टाकत मानाच्या पंक्तीत स्थान मिळवलं आहे.

अवश्य वाचा – IND vs NZ : नेपियरच्या मैदानात शमीच्या बळींचं शतक, केली अनोख्या विक्रमाची नोंद

भारताकडून वन-डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद 5 हजार धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत शिखर धवन दुसऱ्या स्थानावर पोहचला आहे. धवनने 118 सामन्यांमध्ये ही कामगिरी करुन दाखवली आहे. गांगुली आणि धोनीने अनुक्रमे 126 आणि 135 डावांमध्ये ही कामगिरी केली होती. ऑस्ट्रेलिया दौऱ्याप्रमाणे भारतीय गोलंदाजांनी न्यूझीलंडमध्येही आपली चांगली कामगिरी सुरु ठेवली आहे. आगामी विश्वचषकाच्या दृष्टीकोनातून भारताचा न्यूझीलंड दौरा हा महत्वाचा मानला जात आहे. त्यामुळे या दौऱ्यात भारतीय गोलंदाजांच्या कामगिरीकडे सर्व क्रिकेटप्रेमींचं लक्ष असणार आहे.

भारताकडून वन-डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद 5 हजार धावांचा टप्पा ओलांडणारे फलंदाज – 

  • विराट कोहली – 114 सामने
  • शिखर धवन – 118 सामने
  • सौरव गांगुली – 126
  • महेंद्रसिंह धोनी – 135
  • गौतम गंभीर – 135

अवश्य वाचा – IND vs NZ : ‘चायनामन’ कुलदीप यादव नेपियरच्या मैदानात चमकला

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 23, 2019 12:01 pm

Web Title: ind vs nz dhawan becomes second fastest indian to 5000 odi runs
Next Stories
1 अमिताभ बच्चन आयपीएलच्या मैदानात उतरण्यास सज्ज?
2 VIDEO: धोनीचा ‘मास्टर प्लॅन’, कुलदीपची फिरकी अन् अलगद जाळ्यात अडकलेला बोल्ट
3 IND vs NZ : ‘चायनामन’ कुलदीप यादव नेपियरच्या मैदानात चमकला
Just Now!
X