न्यूझीलंड विरुद्धच्या चौथ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय फलंदाजांची दाणादाण उडाली. पहिल्या ३ सामन्यात एकतर्फी विजय मिळवणाऱ्या भारतीय संघाने चौथ्या सामन्यात मात्र न्यूझीलंडच्या गोलंदाजांपुढे गुडघे टेकले. प्रथम फलंदाजी करताना भारताचा डाव अवघ्या ९२ धावांवर आटोपला आणि केवळ १५ षटकात न्यूझीलंडने हे आव्हान पार केले.

या नामुष्कीनंतर ट्विटरवर अनेकांनी टीम इंडियाच्या फलंदाजीबाबत ट्विट केले. पण यात इंग्लंडचा कर्णधार मायकल वॉन याने केलेले ट्विट अधिक चर्चेत आले. त्याचे कारण त्याने केलेल्या ट्विटवरील नेटिझन्सच्या प्रतिक्रिया… भारताचा संघ ९२ धावांत बाद झाल्यानंतर वॉनने ट्विट केले. यात ‘भारत सर्वबाद ९२ … हल्लीच्या दिवसात एखादा संघ १०० धावांच्या आत गारद होतो यावर विश्वासच बसत नाही’ असे खोडसाळ ट्विट केले होते.

Michael Vaughan Claims Rohit Sharma to join CSK next year
IPL 2024 : ‘पुढच्या वर्षी रोहित चेन्नईकडून खेळताना दिसणार…’, इंग्लंडच्या माजी कर्णधाराचा मोठा दावा
Operation Meghdoot, Siachen,
विश्लेषण : पाकिस्तानला चकवा देत सियाचिनवर कब्जा… थरारक ‘ऑपरेशन मेघदूत’ मोहीम कशी फत्ते झाली?
Despite the efforts of PR Sreejesh the Indian hockey team lost
श्रीजेशच्या प्रयत्नांनंतरही भारतीय हॉकी संघाचा पराभव
Maldives Minister Mariyam Shiuna
मालदीवच्या निलंबित मंत्र्याकडून भारतीय ध्वजाचा अपमान; तीव्र प्रतिक्रिया उमटताच मागितली माफी

त्याच्या या ट्विटनंतर नेटिझन्सने त्याच्यावर जोरदार हल्लाबोल केला. इंग्लंडचा संघ काही दिवसांपूर्वी विंडीजविरुद्ध ७७ धावांत गारद झाला होता. त्याची आठवण साऱ्यांनी त्याला करून दिली आणि त्याचेच दात घशात घातले.

==

दरम्यान, चौथ्या सामन्यात भारतीय डावाची सुरुवातच खराब झाली होती. शिखर धवन आणि रोहित शर्मा ही जोडी झटपट माघारी परतली. कारकिर्दीतील २००वा सामना खेळणाऱ्या रोहित शर्माला अवघ्या ७ धावा करता आल्या. विराट कोहलीच्या जागेवर संघात स्थान मिळालेला शुभमन गिलही आपला प्रभाव पाडू शकला नाही. यानंतर एकामागोमाग एक फलंदाज बोल्ट आणि डी-ग्रँडहोमच्या जाळ्यात अडकत गेले. न्यूझीलंडकडून ट्रेंट बोल्टने १० षटकात २१ धावांत ५ तर कॉलिन डी-ग्रँडहोमने १० षटकात २६ धावांमध्ये ३ बळी घेतले. तर टॉड अस्टल आणि जिमी निशम यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला. भारताकडून युझवेन्द्र चहल याने सर्वाधिक १८ धावा केल्या आणि तो नाबाद राहिला.