News Flash

चौथ्या टी-२० आधी यजमानांना धक्का, कर्णधार विल्यमसन दुखापतीमुळे संघाबाहेर

टीम साऊदीकडे संघाचं नेतृत्व

भारतीय संघाविरुद्ध टी-२० मालिका गमावल्यानंतर, न्यूझीलंडच्या चिंतेत आणखी भर पडली आहे. तिसऱ्या टी-२० सामन्यात धडाकेबाज खेळी करणारा न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन चौथ्या टी-२० सामन्यातून बाहेर पडला आहे. विल्यमसनच्या डाव्या खांद्याला दुखापत झालेली आहे, त्याच्या बदली संघातला अनुभवी गोलंदाज टीम साऊदी चौथ्या सामन्यात न्यूझीलंडचं नेतृत्व करेल.

तिसऱ्या टी-२० सामन्यात क्षेत्ररक्षणादरम्यान विल्यमसनला ही दुखापत झाली होती. मात्र चौथ्या टी-२० सामन्यात विल्यमसन खेळू शकला नसला तरीही अखेरच्या टी-२० सामन्यापर्यंत तो पुनरागमन करेल अशी माहिती, न्यूझीलंडच्या संघ व्यवस्थापनाने दिली आहे. दरम्यान न्यूझीलंडच्या धरतीवर भारतीय संघाने टी-२० मालिका जिंकण्याची ही पहिलीच वेळ ठरली आहे. टी-२० मालिकेनंतर भारतीय संघ न्यूझीलंडमध्ये ३ वन-डे आणि २ कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. त्यामुळे या मालिकेत न्यूझीलंडचा संघ कसं पुनरागमन करतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 31, 2020 11:40 am

Web Title: ind vs nz kane williamson ruled out of 4th t20 due to shoulder injury psd 91
टॅग : Ind Vs Nz
Next Stories
1 महाराष्ट्रात मी फिरायला कुठे जाऊ शकतो?? अजिंक्य रहाणेला हवी आहे तुमची मदत
2 कृपा करा, प्रशिक्षकासाठी अर्ज करु नका ! जसप्रीत बुमराहला सल्ला देणारे संजय मांजरेकर ट्रोल
3 सुपरओव्हरवर बंदी घाला, भारताच्या विजयानंतर क्रीडामंत्र्यांची अजब मागणी
Just Now!
X