News Flash

Ind vs NZ : दुखापतीमधून सावरलेला विल्यमसन पुनरागमनाच्या तयारीत

न्यूझीलंडच्या प्रशिक्षकांनी दिली माहिती

न्यूझीलंडविरुद्ध टी-२० मालिकेत ५-० ने बाजी मारल्यानंतर भारतीय संघाला वन-डे मालिकेत धक्का बसला. प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत मैदानात उतरलेल्या भारतीय संघाने पहिले दोन सामने गमावले. ३ वन-डे सामन्यांची मालिका गमावल्यानंतर भारतीय संघ व्हाईटवॉश टाळण्यासाठी अखेरच्या वन-डे सामन्यात खेळणार आहे. मात्र या सामन्यातही भारतीय संघासमोर न्यूझीलंडचं तगडं आव्हान असणार आहे. कारण न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन खांद्याच्या दुखापतीमधून सावरलेला असून तो पुनरागमनासाठी सज्ज झालेला आहे.

“विल्यमसन आता दुखापतीमधून सावरलेला आहे, तो सध्या आपलं वर्कआऊट सेशन चांगलं पार पाडतोय. तो खेळण्यासाठी आता सज्ज आहे…सकाळी आम्ही त्याला अजुन काही त्रास जाणवत नाहीये ना याची तपासणी करु”, न्यूझीलंडच्या मुख्य प्रशिक्षकांनी तिसऱ्या वन-डे सामन्याआधी पत्रकारांशी बोलताना माहिती दिली.

तिसऱ्या वन-डे सामन्याआधी न्यूझीलंडने इश सोधी आणि टिकनर या दोन्ही खेळाडूंना संघात स्थान दिलं आहे. न्यूझीलंडच्या संघातले ३ खेळाडू सध्या आजारी आहेत…त्यामुळे अंतिम सामन्याआधी न्यूझीलंडच्या संघ व्यवस्थापनाने खबरदारीचा उपाय म्हणून सोधी आणि टिकनरला संघात स्तान दिलंय. दरम्यान अखेरचा वन-डे सामना जिंकून टी-२० मालिकेतल्या पराभवाचा बदला घेण्याची नामी संधी न्यूझीलंडच्या संघाकडे असणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 10, 2020 2:58 pm

Web Title: ind vs nz kane williamson set for return in 3rd odi against india psd 91
Next Stories
1 U-19 World Cup Final : विजयाचा उन्माद बांगलादेशला भोवणार, ICC कारवाईच्या तयारीत
2 U-19 World Cup : बांगलादेशी खेळाडूंचं सेलिब्रेशन किळसवाणं होतं, भारतीय कर्णधाराची प्रतिक्रिया
3 अजिंक्य रहाणेचं नाबाद शतक, दुसरा अनौपचारिक कसोटी सामना अनिर्णित
Just Now!
X