अखेरच्या एकदिवसीय सामन्यात यजमान न्यझीलंड संघाला मोठा धक्का बसला आहे. सलामीवीर फलंदाज मार्टिन गप्टिल दुखापतीमुळे दुखापतीमुळे अखेरच्या वनडे सामन्याला मुकण्याची शक्यता आहे. अतिरिक्त सलामीवीर म्हणून न्यूझीलंड संघात कॉलिन मुन्रोला बोलवण्याता आले आहे. गप्टिलच्या दुखापतीवर उपचार सुरू असून तो फिजिओच्या निरिक्षणाखाली आहे.

काल शनिवारी सरावादरम्यान गप्टिलच्या कमरेला जखम झाली. त्यानंतर फिजियो विजय वल्लभ आणि सिक्योरिटी मॅनेजर टेरी मिनिश यांच्या मदतीने गप्टिलने मैदान सोडलं. त्यामुळे अखेरच्या सामन्यात गप्टिलच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह आहे. न्यूझीलंड क्रिकेट मंडळाने गप्टिलच्या दुखापतीची माहिती सोशल मीडियाच्या माध्यामातून दिली आहे.

पाच एकदविसीय सामन्यात भारत ३-१ ने आघाडीवर आहे. पहिल्या तीन सामन्यात दारूण पराभव झाल्यानंतर चौथ्या सामन्यात न्यूझालंड संघाने भारताचा दारूण पराभव केला होता. आता पाचव्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघ कसं प्रदर्शन करतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. न्यूझीलंडच्या भेदक गोलंदाजीपुढे भारताताची भक्कम फलंदाजाची फळी कोसळली होती. अखेरच्या सामन्यात भारतीय संघात धोनीची निवड होण्याची शक्यता आहे.