भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा न्यूझीलंड विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत टीम इंडियाचा भाग आहे. दुसऱ्या सामन्यात धोनीने ४८ धावांचजि उपयुक्त केली होती. पण दुखापतीमुळे त्याला तिसऱ्या सामन्याला मुकावे लागले होते. हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे त्याला संघाबाहेर रहावे लागले होते. मात्र गुरुवारी होणाऱ्या चौथ्या एकदिवसीय सामन्यात धोनी खेळणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

५ सामन्याच्या या मालिकेत भारतीय संघाने ३-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. त्यातच नियमित कर्णधार विराट कोहली याला विश्रांती देण्यात आल्याने रोहित शर्माकडे कर्णधारपदाची धुरा देण्यात येणार आहे. धोनीदेखील आज नेट्समध्ये सराव करताना दिसून आला आहे. त्यामुळे धोनीने संघात कमबॅक करण्याची शक्यता अधिक असल्याचे म्हटले जात आहे.

BCCI ने सराव सत्राचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यात धोनीदेखील सराव करताना दिसत आहे. या मालिकेतील चौथा सामना गुरुवारी (३१) होणार आहे. तर अखेरचा सामना ३ फेब्रुवारीला होणार आहे.