भारत विरुद्ध न्यूझीलंडदरम्यानच्या टी-२० मालिकेमधील सलग दुसऱ्या सामन्याचा निकाल सुपर ओव्हरने लागला. तिसऱ्या सामन्याप्रमाणेच शुक्रवारी झालेला चौथा सामनाही भारताने सुपर ओव्हरमध्ये जिंकला. अतिशय रोमहर्षक ठरलेल्या सुपर ओव्हरमध्ये भारताने न्युझीलंडचा पराभव करत चौथ्या टी -२० सामन्यात विजय मिळवला आहे. सुपर ओव्हरमध्ये पराभव होण्याची न्यूझीलंडची ही पहिलीच वेळ नव्हती.

सुपर ओव्हरमध्ये न्यूझीलंडला आतापर्यंत फक्त एकदाच विजय मिळवता आला आहे. मागील १२ वर्षांमध्ये न्यूझीलंडचा संघ सात वेळा सुपर ओव्हरचे सामने खेळावे लागले आहेत. त्यापैकी सहा सामने न्यूझीलंडने गमावले आहेत. आज सलग दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडचा सुपर ओव्हरमध्ये पराभव झाल्यामुळे नेटकऱ्यांनी त्यांना चांगलेच ट्रोल केलं आहे.

हे केवळ न्यूझीलंडच करु शकतो

२० खेळायला आलो २१ खेळतोय

रोज तेच

सामान्य सामना आणि सुपर ओव्हर

सुपर ओव्हरचे नाव ऐकल्यावर न्यूझीलंड संघ

तुमच्याकडेच ठेवा

तेव्हा आणि सुपर ओव्हरमध्ये

फरक

सवय झालीय

पुन्हा एकदा फरक

करु सहन

सुपर ओव्हरचं नाव ऐकल्यावर

तुम्हाला नाही जमणार

आम्ही कसे पुढे येतो

अनेकदा आणि सुपर ओव्हरमध्ये

पुढच्या वेळेसाठी शुभेच्छा…

हे तुमच्यासाठी नाही

बंद करा

२००८ ते २०२० या दरम्यान न्यूझीलंड संघाला भारताबरोबरच वेस्ट इंडिज संघाने सुपर ओव्हरमध्ये दोनदा पराभूत केलं आहे. वेस्ट इंडिजने २००८ आणि २०१२ मध्ये न्यूझीलंडला सुपर ओव्हरमध्ये हरवलं होतं.