न्यूझीलंडने पहिल्या टी २० सामन्यात भारताला ८० धावांनी धूळ चारली. सलामीवीर टीम सिफर्ट याच्या ८४ धावांच्या झंझावाती खेळीच्या जोरावर न्यूझीलंडने २० षटकात २१९ धावांपर्यंत मजल मारली. पण आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या भारताला मात्र केवळ १३९ धावाच करता आल्या. सिफर्टने केलेल्या ४३ चेंडूत ८४ धावांच्या दमदार खेळीमागे नक्की कोणाचे मार्गदर्शन होते? असा प्रश्न साऱ्यांनाच पडला होता. यावर सिफर्ट याने उत्तर देत प्रश्नांना पूर्णविराम दिला आहे.
Player of the Match Tim Seifert! Check out highlights from his 84 off 43 balls here | https://t.co/Dbnn1dR7t6 #NZvIND = @PhotosportNZ pic.twitter.com/zAgm4iFpVT
— BLACKCAPS (@BLACKCAPS) February 6, 2019
‘मला सलामीवीर म्हणून मैदानात उतरावे लागणार आहे, हे ज्यावेळी मला समजले तेव्हा मी स्वतःशीच थोडासा हसलो. पण नंतर मात्र मला समजले की मला सलामीलाच फलंदाजी करायची आहे. त्यामुळे मी माजी कर्णधार आणि तडाखेबाज फलंदाज ब्रेंडन मॅक्युलम याच्या युट्यूबवरील व्हिडीओ पहिल्या आणि त्यातून मला खूप काही शिकायला मिळाले’, असे सिफर्टने स्टार स्पोर्ट्सशी बोलताना सांगितले.
‘लहानपणापासून मी मॅक्युलमचा चाहता आहे. आपण आपल्या पद्धतीने खेळावे असे जाणकार म्हणत असतील, पण मला मात्र त्याच्या व्हिडीओ बघून खूप फायदा झाला. मी कोणत्याही फटाक्याचा विशेष असा सराव केला नव्हता. मैदानावर खेळताना मी त्या क्षणी जे वाटेल तसेच फटके खेळलो, पण त्यासाठी मी पाहिलेल्या व्हिडिओचा मला उपयोग झाला’, असेही त्याने स्पष्ट केले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 7, 2019 2:35 pm