News Flash

‘लेडी सेहवाग’ शफाली वर्माचा पदार्पणाच्या कसोटीत धावांचा पाऊस!

आता रोहित शर्मा-शिखर धवनच्या 'त्या' विक्रमावर शफालीची नजर

ind vs nz shafali verma becomes youngest to score fifty in both innings on test debut
शफाली वर्मा

‘लेडी सेहवाग’ म्हणून ओळखली जाणारी भारताची स्फोटक सलामीवीर महिला फलंदाज शफाली वर्माने तिच्या पदार्पणाच्या कसोटी सामन्याच्या दोन्ही डावात अर्धशतके झळकावून इतिहास रचला आहे. पदार्पणाच्या कसोटी सामन्यात दोन्ही डावात ५० हून अधिक धावांची खेळी करणारी १७ वर्षीय शफाली सर्वात युवा फलंदाज ठरली आहे. अशी कामगिरी करणारी ती जगातील पहिली भारतीय आणि चौथी महिला फलंदाज आहे. इंग्लंडविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्याच्या तिसर्‍या दिवशी तिने ही कामगिरी केली. शफालीने पहिल्या डावात ९६ धावांची खेळी केली होती, तर तिसर्‍या दिवशी खेळ संपेपर्यंत ती ५५ धावांवर नाबाद राहिली होती.

रोहित शर्मा-शिखर धवनच्या विक्रमावर शफालीची नजर

शफालीने या कसोटी सामन्यात आतापर्यंत १५१ धावा केल्या आहेत. पदार्पणाच्या कसोटीत दीडशेहून अधिक धावा करणारा शफाली ही भारताची चौथी फलंदाज आहे. पदार्पणाच्या कसोटीत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम शिखर धवनच्या नावावर आहे. धवनने २०१३मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध १८७ धावा केल्या होत्या. यानंतर रोहितने २०१३मध्येच वेस्ट इंडिजविरुद्ध १७७ धावा केल्या होत्या. लाला अमरनाथ यात तिसऱ्या क्रमांकावर आहेत, १९३३मध्ये त्यांनी इंग्लंडविरुद्ध १६६ धावा केल्या. पदार्पणाच्या कसोटीत भारताकडून सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम शफाली करू शकते आणि त्यासाठी तिला ३७ धावांची गरज आहे.

हेही वाचा – पंडित नेहरूंनी आग्रह केला अन् मिल्खा सिंग बनले ‘फ्लाईंग शिख’

पहिल्या डावात शफालीने शतक अवघ्या चार धावांनी हुकले होते. महिला क्रिकेटच्या इतिहासात शतक ठोकणारी सर्वात युवा फलंदाज होण्याचा विक्रम तिला खुणावतो आहे. या डावात ती शतक झळकावू शकते. शफाली आता १७ वर्षे १४२ दिवसांची आहे आणि जर तिने शतक ठोकले, तर सचिन तेंडुलकरनंतर ती सर्वात कमी वयातील शतक ठोकणारी भारतीय खेळाडू असेल. १७ वर्ष १०७ दिवस असे वय असताना १९९०मध्ये सचिनने इंग्लंडविरुद्ध मॅनचेस्टर कसोटीत ११९ धावांची खेळी केली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 19, 2021 3:39 pm

Web Title: ind vs nz shafali verma becomes youngest to score fifty in both innings on test debut adn 96
Next Stories
1 Copa America स्पर्धेत अर्जेंटिना, चिलेची विजयी पताका
2 Euro Cup 2020: बलाढ्य पोर्तुगाल आणि जर्मनी आमनेसामने; हंगेरी, स्पेन, पोलंडचा लागणार निकाल
3 WTC Final Day 2 : दुसऱ्या दिवसाचा खेळ अंधूक प्रकाशामुळे थांबला
Just Now!
X