News Flash

IND vs NZ : याआधीही अति सूर्यप्रकाशामुळे थांबवण्यात आले होते ‘हे’ सामने

भारत-न्यूझीलंड सामना अति प्रकाशामुळे थांबवण्यात आला होता

न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात भारताने विजयी सलामी दिली. नेपियर एकदिवसीय सामन्यात भारताने सुमारे १५ षटके आणि ८ गडी राखून विजय मिळवला. या सामन्यात भारताने न्यूझीलंडला अवघ्या १५७ धावांत गुंडाळले. १५८ धावांच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा डाव एकूण २ वेळा थांबवण्यात आला. पहिल्यांदा उपहाराच्या विश्रांतीमुळे खेळ थांबवण्यात आला होता. नियोजित वेळेआधी न्यूझीलंडचा डाव संपला. त्यामुळे भारताला लगेच फलंदाजीसाठी यावे लागले आणि त्यानंतर उपहाराची विश्रांती घेण्यात आली.

दुसऱ्या वेळी मात्र हा सामना एका विचित्र कारणासाठी थांबवण्यात आला. अति सूर्यप्रकाश असल्यामुळे हा सामना थांबवावा लागल्याचा प्रकार या सामन्यात घडला. फलंदाजी करताना सूर्यकिरणे थेट डोळ्यावर येत असल्याने खेळ थांबवण्यात आला होता. शिखर धवन फलंदाजी करत असताना त्याने चेंडू दिसत नसल्याची पंचांकडे तक्रार केली. त्यानंतर पंचांनी याबाबत चर्चा करून सामना थांबवण्याचा निर्णय घेतला. अपुऱ्या प्रकाशामुळे अनेकदा खेळ थांबवावा लागतो, पण आज अति प्रकाशामुळे खेळ थांबला. भारताची धावसंख्या १ बाद ४४ धावा अशी असताना खेळ थांबवण्यात आला होता.

या घटनेनंतर अनेक नेटिझन्सने हा प्रकार प्रथमच पाहिल्याचे ट्विट केले. पण या आधीही अति सूर्यप्रकाशामुळे असाच एक सामना थांबवण्यात आला होता. या आधी देशांतर्गत स्पर्धा सुपर स्मॅश क्रिकेट लीगमध्ये सेंट्रल स्टेज आणि कँटेबरी किंग्ज यांच्यातील सामना अतिरिक्त सुर्यकिरणांमुळे थांबवण्यात आला होता. तसेच २०१८ मध्ये लंडनमध्ये केंट स्पिटफायर आणि एसेस्क इगल्स यांच्यातील सामनाही याच कारणामुळे थांबवण्यात आला होता.

नेपियरची खेळपट्टी ही जगातील अन्य खेळपट्टींपेक्षा वेगळी आहे. जगभरातील सर्व क्रिकेट स्टेडियम्समधील खेळपट्ट्या या उत्तर-दक्षिण अशा आहेत. पण नेपियरची खेळपट्टी ही पूर्व-पश्चिम अशी असल्याने सूर्याची किरणे थेट फलंदाजाच्या डोळ्यावर येतात. दरम्यान, शिखर धववने नाबाद खेळी करून भारताला विजय मिळवून दिला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 23, 2019 6:41 pm

Web Title: ind vs nz sun had stopped play before india new zealand match in several times
Next Stories
1 IND vs NZ : विराटमुळेच ‘सामनावीर’ ठरलो – मोहम्मद शमी
2 Video : विजयानंतर कोहलीने मैदानातच केला भन्नाट डान्स
3 IND vs NZ : छोटेखानी खेळीत अंबाती रायुडूचा विक्रम, धोनी-कोहलीला दिला धोबीपछाड !
Just Now!
X