भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला सामना नेपियर येथे सुरु आहे. या सामन्यात भारताने न्यूझीलंडला अवघ्या १५७ धावांत गुंडाळले. १५८ धावांच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा डाव एकूण २ वेळा थांबवण्यात आला. पहिल्यांदा उपहाराच्या विश्रांतीमुळे खेळ थांबवण्यात आला होता. नियोजित वेळेआधी न्यूझीलंडचा डाव संपला. त्यामुळे भारताला लगेच फलंदाजीसाठी यावे लागले आणि त्यानंतर उपहाराची विश्रांती घेण्यात आली.

दुसऱ्या वेळी मात्र हा सामना एका विचित्र कारणासाठी थांबवण्यात आला. अति सूर्यप्रकाश असल्यामुळे हा सामना थांबवावा लागल्याचा प्रकार या सामन्यात घडला.

फलंदाजी करताना सूर्यकिरणे थेट डोळ्यावर येत असल्याने खेळ थांबवण्यात आला होता. शिखर धवन फलंदाजी करत असताना त्याने चेंडू दिसत नसल्याची पंचांकडे तक्रार केली. त्यानंतर पंचांनी याबाबत चर्चा करून सामना थांबवण्याचा निर्णय घेतला. अपुऱ्या प्रकाशामुळे अनेकदा खेळ थांबवावा लागतो, पण आज अति प्रकाशामुळे खेळ थांबला. भारताची धावसंख्या १ बाद ४४ धावा अशी असताना खेळ थांबवण्यात आला होता.

यावर नेटकऱ्यांनीही मजेशीर कमेंट केल्या आहेत..

दरम्यान, खेळ थांबवण्यात आल्यामुळे सामना १ षटकाने कमी करण्यात आला होता आणि आव्हान १ धावेने कमी करण्यात आले होते.