06 March 2021

News Flash

ऋषभ पंत म्हणजे BCCI ची ‘गलती से मिस्टेक’!

खराब कामगिरीमुळे चाहत्यांनी केलं तुफान ट्रोल

ख्राईस्टचर्च कसोटीच्या पहिल्या दिवशी यजमान न्यूझीलंडने आपलं वर्चस्व निर्माण केलं. भारतीय संघाने केलेल्या २४२ धावांना प्रत्युत्तर देताना दिवसाअखेरीस न्यूझीलंडने बिनबाद ६३ धावांपर्यंत मजल मारली. सलामीवीर टॉम लॅथमने नाबाद २७ तर टॉम ब्लंडलने नाबाद २९ धावा केल्या. या सामन्यात भारतीय फलंदाजांनी अत्यंत खराब कामगिरी केली. एकदिवसीय आणि टी २० क्रिकेटमध्ये संघात स्थान मिळालेल्या ऋषभ पंतला कसोटीत संघात स्थान मिळाले. पण पहिल्या सामन्यात तो अपयशी ठरला. त्यानंतर आज दुसऱ्या सामन्यातदेखील पहिल्या डावात तो स्वस्तात बाद झाला. त्यामुळे त्याला मोठ्या प्रमाणावर ट्रोल करण्यात आले.

हे वाचा – अरेरे! शफाली सलग दुसऱ्यांदा ठरली कमनशिबी

Special : सौंदर्यवती मारिया शारापोव्हाचे खास फोटो

असा रंगला पहिल्या दिवसाचा खेळ

भारतीय संघाने दुसऱ्या कसोटी सामन्यात आश्वासक सुरुवात केली होती. मुंबईकर पृथ्वी शॉने झळकावेल्या अर्धशतकी खेळाच्या जोरावर भारताने पहिल्या दिवशी उपहाराच्या सत्रापर्यंत २ बाद ८५ पर्यंत मजल मारली. मयांक अग्रवाल मात्र पुन्हा अपयशी ठरला. यानंतर पृथ्वीने चेतेश्वर पुजाराच्या सोबतीने भारतीय संघाचा डाव सावरला. न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा नेटाने सामना करत पृथ्वीने काही सुरेख मैदानी फटके खेळले. निल वँगरच्या गोलंदाजीवर षटकार खेचत पृथ्वीने आपलं अर्धशतकही साजरं केलं. पुजारासोबत दुसऱ्या विकेटसाठी केलेल्या अर्धशतकी भागीदारीमुळे भारताचा डाव सावरला गेला.

Video : बजाओ…! मैदानाबाहेरही रंगला भारत-श्रीलंका सामना

उपहाराच्या सत्रानंतर टीम इंडियाचे महत्वाचे फलंदाज झटपट बाद झाले. विराट ३ धावांवर साऊदीच्या गोलंदाजीवर तर रहाणे ७ धावांवर माघारी परतला. मात्र चेतेश्वर पुजारा आणि हुनमा विहारीने संयमी खेळी करत भारताची अधिक पडझड थांबवली. पाचव्या विकेटसाठी दोन्ही फलंदाजांनी ८१ धावांची भागीदारी केली. चेतेश्वर पुजाराने या दरम्यान आपलं अर्धशतकं साजरं केलं. पाठोपाठ हनुमा विहारीनेही अर्धशतक झळकावलं. चहापानाच्या सत्राआधी हनुमा विहारी वँगरच्या गोलंदाजीवर माघारी परतला. त्याने ५५ धावांची खेळी केली.

श्रीलंकेची खराब फलंदाजी; पण कर्णधार अटापटूचा विक्रम

चहापानाच्या सत्रानंतर पुन्हा एकदा भारतीय फलंदाजांनी हाराकिरी केली. चेतेश्वर पुजारा मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात जेमिसनच्या गोलंदाजीवर माघारी परतला. यानंतर एकामागोमाग एक फलंदाज माघारी परतत राहिले. अखेरच्या फळीत मोहम्मद शमीने फटकेबाजी करत भारताला २४२ धावांपर्यंत मजल मारुन दिली. उंचपुऱ्या जेमिसनने भारताच्या शेपटाला गुंडाळण्याचं काम केलं. न्यूझीलंडकडून जेमिसनने ५, टीम साऊदी-ट्रेंट बोल्टने २ तर निल वँगरने १ बळी घेतला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 29, 2020 3:18 pm

Web Title: ind vs nz team india batsman rishabh pant brutally trolled for yet another poor batting performance against new zealand vjb 91
Next Stories
1 Video : बजाओ…! मैदानाबाहेरही रंगला भारत-श्रीलंका सामना
2 अरेरे! शफाली सलग दुसऱ्यांदा ठरली कमनशिबी
3 Video : कुस्तीचं मैदान गाजवणाऱ्या आळंदीच्या ‘गुंड’ मुलीची कहाणी
Just Now!
X