टीम इंडियाने न्यूझीलंडविरुद्ध एकदिवसीय मालिका ४-१ अशी जिंकली. या मालिकेत युझवेन्द्र चहल याने चौथ्या सामन्यात भारताकडून सर्वाधिक १८ धावा केल्या आणि तो नाबाद राहिला. या नंतर चहल टीव्ही वर रोहितला जेव्हा चहलने एक प्रश्न विचारला, तेव्हा रोहितने त्याला चक्क खरमरीत उत्तर दिले.

गेल्या महिन्यात ऑस्ट्रेलियात झालेल्या वन डे मालिकेत ‘Chahal TV’ची सुरुवात करण्यात आली. या टिव्हीवर क्रिकेटपटू सामन्यानंतर गप्पा मारतात आणि संघाच्या एकूण कामगिरीवर चाहत्यांना माहिती देतात. कर्णधार विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी ‘Chahal TV’वर मुलाखत दिल्यानंतर हा कार्यक्रम भलताच हिट झाला. मात्र या कार्यक्रमात रोहितने चहलच्या प्रश्नाला असे काही उत्तर दिले की ‘हे उत्तर म्हणजे माझा अपमान केल्यासारखे आहे’ असेही चहल म्हणाला.

विराट सध्या संघात नाही. त्यामुळे मला फलंदाजीच्या क्रमात बढती मिळण्याची संधी द्याल का? असा प्रश्न चहलने रोहितला विचारला होता. त्यावर रोहित म्हणाला की भारतीय संघ फलंदाजीमध्ये फक्त १० खेळाडूंचा विचार करतो. अकराव्या खेळाडूचा आम्ही फलंदाजीसाठी विचार करत नाही. जसा तू संघातील अकरावा खेळाडू आहेस.

व्हिडीओ-

रोहितचे हे विधान ऐकून चहल त्याला म्हणाला की सर्वांसमोर हा तर माझा अपमान आहे. मात्र हे सारं अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात सुरु होते. दरम्यान, आता भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध टी२० मालिका खेळणार आहे.