News Flash

IND vs NZ : हिटमॅन-गब्बर जोडीने मोडला सचिन-सेहवागचा विक्रम

रोहितने ८७ तर धवनने ६६ धावा केल्या

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात दुसरा एकदिवसीय सामना सुरू आहे. या सामन्यात भारताने न्यूझीलंडपुढे ३२५ धावांचे आव्हान ठेवले आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताने ४ बाद ३२४ धावा केल्या. सलामीवीर शिखर धवन आणि रोहित शर्मा या दोघांनी शतकी भागीदारी केली. त्यामुळेच भारताच्या भक्कम धावसंख्येची पायाभरणी झाली. याबरोबरच धवन-रोहित जोडीने सचिन-सेहवाग जोडीचा विक्रम मोडला.

शिखर धवन-रोहित शर्माने आज १५४ धावांची सलामी दिली. दोघांनी अर्धशतके ठोकत न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. या शतकी भागीदारीच्या जोरावर या जोडीने भारतासाठी कोणत्याही विकेटसाठी सर्वात अधिक शतकी भागीदारी करणाऱ्या जोडीच्या यादीत तिसरा क्रमांक पटकावला. सचिन-सेहवागने १३ वेळा शतकी भागीदारी केली होती. मात्र आज धवन-रोहितने १४व्यांदा शतकी भागीदारी केली आणि सचिन सेहवाग जोडीचा विक्रम मोडला. या यादीत सचिन-गांगुली जोडी (२६ वेळा) पहिल्या तर रोहित शर्मा-विराट कोहली जोडी (१५ वेळा) दुसऱ्या स्थानी आहे.

दरम्यान, हे दोघे अर्धशतक करून बाद झाल्यानंतर विराट कोहलीने ४३ तर रायडूने ४७ धावा केल्या आणि धावसंख्येत मोलाची भर घातली. तर शेवटच्या काही षटकात धोनी (४८) आणि केदार जाधव (२२) यांनी फटकेबाजी करत भारताची धावसंख्या तीनशेपार नेली. न्यूझीलंडकडून बोल्ट आणि फर्ग्युसनने २-२ बळी टिपले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 26, 2019 12:39 pm

Web Title: ind vs nz team india shikhar dhawan rohit sharma breaks record of sachin tendulkar virender sehwag of century partnership in odis
Next Stories
1 ‘होल्डर’चा इंग्लंडला झटका.. ८व्या क्रमांकावर ठोकले द्विशतक
2 Video : पारंपरिक पद्धतीने झाले ‘टीम इंडिया’चे स्वागत
3 IND vs NZ : कुलदीपचा बळींचा चौकार, भारताचा ९० धावांनी विजय
Just Now!
X